RBI Alert: चुकूनही डाऊनलोड करु नका हे App , काही सेकंदातच तुमचे Bank Account  होईल रिकामे
RBI Alert | (Photo credit: archived, edited, representative image)

तुम्ही जर नेटबँकींग करत असाल तर, थांबा. आगोदर भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) जो धोक्याचा इशारा (RBI Alert) देत आहे तो वाचा. तुम्हाला जर सोशल मीडिया किंवा कोणत्या इतर माध्यमातून मेबाईल अॅप AnyDesk (एनीडेस्‍क) डाऊनलोड करण्यासाठी सूचवले जात असेल तर, त्याकडे मुळीच ध्यान देऊ नका. हे अॅप चुकूनही डाऊनलोड करु नका. अन्यथा तुमच्या बँक खात्या कितीही पैसे असले तरी, काही सेकंदात ते खाते रिकामे होईल. RBI ने याबाबत नुकताच Alert (धोक्याचा इशारा) दिला आहे. त्यात म्हटले आहे की, AnyDesk एक असे सॉफ्टवेअर आहे. जे मोबाईल, लॅपटॉप, संगणक आदींच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करु शकते.

पत्रकाद्वारे एक धोक्याचा इशारा

भारतीय रिझर्व्ह बँकेने हे अॅप डाऊनलोड करणाऱ्या मंडळींसाठी पत्रकाद्वारे एक धोक्याचा इशारा दिला आहे. RBI ने म्हटले आहे की, हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर आपल्याच डिवाइसवर युजर्सचा ताबा राहात नाही. सायबर गुन्हेगार या अॅपच्या माध्यमातून जगभरातील कोणत्याही डिवाइसच्या माध्यमातून रिमोटली एक्सेस करत तुमचे बँक अकाऊंट रिकामे करतात. UPI (यूनिफायड पेमेंट्स इंटरफेस) च्या माध्यमातून वाढत्या अफरातफरी, फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांचे प्रमाण पाहून लोकाना जागृत करण्यासाठी आरबीआयने महत्त्वाचे पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. (हेही वाचा, नोकरीला कंटाळलात? मग स्वत:चे सरकारमान्य Post-Office सुरु करा, कमवा बक्कळ पैसा)

RBI Alert | (Photo credit: rbi)

AnyDesk App अशी करते फसवणूक

तुम्ही एकदा का AnyDesk App डाऊनलोड केल्यावर यूजरच्या डिवाइसवर (स्मार्टफोन, लॅपटॉप, संगणक) एक 9 अंकी अॅप कोड जनरेट केला जातो. त्यानंतर हे हॅकर, सायबर गुन्हेगार युजरकडे बँकेच्या नावाने खासगी तपशील मागतात. एकदा का हा कोड मिळाला की, हॅकर, सायबर गुन्हेगार यूजरच्या डिवइसवर ताबा मिळवतात. एकदा का हा ताबा मिळवला की, तुमचे सगळे पैसे, माहिती त्यांना हवा तो तपशील हे गुन्हेगार ट्रान्स्फर करतात. म्हणजेच काय तर, तुमचे बँक खाते पूर्णपणे रिकामे होते.