Kolkata Knight Riders Win IPL 2024: कोलकाताने तिसऱ्यांदा जिंकले आयपीएल विजेतेपद, फायनलमध्ये हैदराबादला केले पराभूत
आयपीएल 2024 चा अंतिम सामना (IPL 2024 Final) आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद (KKR vs SRH) यांच्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium, Chennai) खेळवला गेला. या सामन्यात कोलकाताने हैदराबादचा 8 गडी राखून पराभव करत आयपीएलच्या विजेतेपदावर तिसऱ्यांदा नाव कोरल आहे.
SRH vs KKR IPL 2024 Final: आयपीएल 2024 चा अंतिम सामना (IPL 2024 Final) आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद (KKR vs SRH) यांच्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium, Chennai) खेळवला गेला. या सामन्यात कोलकाताने हैदराबादचा 8 गडी राखून पराभव करत आयपीएलच्या विजेतेपदावर तिसऱ्यांदा नाव कोरल आहे. तत्तपुर्वी, हैदराबादने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदांजी करताना हेदराबादने कोलकातासमोर 114 धावांचे माफक लक्ष्य ठेवले. सनरायझर्स हैदराबादकडून कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक 24 धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक 3 बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कोलकाताने दोन विकेट गमावून विजय मिळवला. कोलकाता नाईट रायडर्ससाठी स्टार फलंदाज व्यंकटेश अय्यरने नाबाद 52 धावांची शानदार खेळी केली. सनरायझर्स हैदराबादकडून पॅट कमिन्स आणि शाहबाज अहमद यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
𝗖𝗛𝗔𝗠𝗣𝗜𝗢𝗡𝗦 𝗢𝗙 #𝗧𝗔𝗧𝗔𝗜𝗣𝗟 𝟮𝟬𝟮𝟰 😍🏆
The 𝗞𝗢𝗟𝗞𝗔𝗧𝗔 𝗞𝗡𝗜𝗚𝗛𝗧 𝗥𝗜𝗗𝗘𝗥𝗦! 💜#KKRvSRH | #Final | #TheFinalCall | @KKRiders pic.twitter.com/iEfmGOrHVp
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 26, 2024 10:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

