Man Beheads Boss: अमेरिकेतील आघाडीच्या टेक कंपनीचे सीईओ फहीम सालेह यांच्या हत्येप्रकरणी एक खळबळजनक खुलासा समोर आला आहे. ही हत्या उद्योगपतीचा स्वीय सहाय्यक टायरेस हॅस्पिल (Tyrese Haspi) याने केल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी कोर्टात सुनावणीदरम्यान आरोपीच्या वकिलाने सांगितले की, आरोपीला भीती होती की त्याची गर्लफ्रेंड ब्रेकअप होऊ शकते, त्यामुळे त्याने आपल्या बॉसची निर्घृण हत्या केली. आरोपीने आपल्या बॉसकडून 3 कोटींहून अधिक रुपयांची चोरी केली होती व ही बाब त्याच्या गर्लफ्रेंडला कळू नये म्हणून त्याने आपल्या बॉसही हत्या केली. त्याने आधी आपल्या बॉसला चाकूने वार करून ठार केले. मग त्याचे डोके आणि हात कापले. माहितीनुसार, 2020 मध्ये 33 वर्षीय तंत्रज्ञान उद्योजक फहीम सालेह यांचा डोके व हात नसलेला मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी प्राथमिक तपासानंतर सालेहचा पीए आणि आर्थिक सल्लागार टायरेस हसपिल याला अटक करण्यात आली. आता त्याने आता आपण बॉसला का मारले याचा खुलासा केला आहे. आरोपीचा कबुलीजबाब ऐकून न्यायाधीशही चक्रावून गेले. (हेही वाचा: US Horror : आईच्या हलगर्जीपणामुळे 4 वर्षाच्या निरागस मुलीचा मृत्यू; मधूमेह असूनही आहारात शितपेयाचा वापर, 9 वर्षाचा कारावासाची शिक्षा)
पहा पोस्ट-
Man in US beheads boss after stealing $400,000 from him to hide theft from girlfriend https://t.co/EKOAaN6JLu
— WION (@WIONews) May 26, 2024
3
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)