बंगळुरूमध्ये एका चहा विक्रेत्याला 150 हून अधिक घरफोड्यांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पंचक्षरी संगय्या स्वामी असे आरोपीचे नाव असून, त्यांने चार राज्यांमध्ये 150-200 घरफोड्या केल्याची माहिती आहे. या पैशांमधून त्याने आपल्या गर्लफ्रेंडसाठी 3 कोटी रुपयांचा बंगलो खरेदी केल्याचा दावाही केला जात आहे. स्वामी 400 ग्रॅम सोने आणि चांदी घेऊन पळून गेल्याचे वृत्त होते. मात्र आता पोलिसांनी त्याच्याकडून 180 ग्रॅम सोने आणि 150 ग्रॅम चांदी जप्त केली आहे. उर्वरित चोरीचा माल त्याच्या उत्तर प्रदेशातील साथीदाराकडे असल्याचे समजते. पोलीस त्याच्या साथीदाराचा शोध घेत आहेत.
स्वामी हा घटस्फोटित असून, सोलापूरमध्ये तो त्याच्या सरकारी कर्मचारी असलेल्या आईसोबत राहतो. बेंगळुरूमध्ये अटक होण्यापूर्वी तो राजस्थान, तेलंगणा, गुजरात आणि महाराष्ट्रात चोऱ्या करत असल्याचे वृत्त आहे. त्याने कर्नाटकची राजधान बंगळुरू येथे शेवटचा 2010 मध्ये दरोडा टाकला होता. स्वामीचा मोठा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. 2026 मध्ये त्याला गुजरातमध्ये अटक करण्यात आली होती. सुटकेनंतरही त्याने त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच ठेवल्या. मुंबई पोलिसांनीही स्वामीला अनेक वेळा अटक केली होती. स्वामी 2010 नंतर या वर्षी त्याच्या जोडीदाराच्या सांगण्यावरून बंगळुरू येथे चोरीसाठी परतला होता. अलिकडच्या काळात ही त्याची बेंगळुरूची पहिलीच भेट होती. मात्र यावेळी पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली. (हेही वाचा: Howrah Shocker: महिलेने पतीला फसवून 10 लाखांना किडनी विकायला लावली, नंतर रोख रक्कम घेऊन प्रियकरासोबत पळाली; तक्रार दाखल)
घरफोडीप्रकरणी बेंगळुरूमध्ये तरुणाला अटक-
'Over 150 Thefts Across 4 States': Tea Shop Owner Gifts ₹3 Crore Bungalow To His Girlfriend, Arrested In Bengaluru For House Break-Inhttps://t.co/rQqgw73vPr
To get epaper daily on your whatsapp click here:
— Free Press Journal (@fpjindia) February 5, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)