Building Collapses in Delhi: ईशान्य दिल्लीतील वेलकम पोलिस स्टेशन परिसरातील जनता मजदूर कॉलनीमध्ये एक चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत इमारतीत सुमारे 12 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या पोलिस आणि एनडीआरएफ पथके घटनास्थळी पोहोचली आहेत. बचावकार्यात गुंतलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले की, ढिगाऱ्यातून 6 जणांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर 5-6 जण अजूनही ढिगाऱ्यात अडकले आहेत. सध्या घटनास्थळी 7 अग्निशमन दल आणि पोलिस पथके बचाव आणि मदत कार्यात गुंतलेली आहेत. इमारत खूपच जीर्ण झाली होती, त्यामुळेच ही दुर्घटना घडली, असं सांगण्यात येत आहे.

दिल्लीत चार मजली इमारत कोसळली - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)