गुजरातमधील द्वारका येथील महादेव मंदिरातील शिवलिंग गायब झाल्याची घटना समोर आली आहे. महाशिवरात्री उत्सवाच्या एक दिवस आधी, मंगळवारी द्वारका जिल्ह्यातील श्री भीडभंजन भवानीश्वर महादेव मंदिरातून एक शिवलिंग चोरीला गेले. यानंतर आता, ते परत मिळवण्यासाठी आणि चोरांना पकडण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली. श्री भीडभंजन भवानीश्वर महादेव मंदिर गुजरात राज्यातील सोमनाथ येथे स्थित एक प्राचीन आणि पवित्र मंदिर आहे. हे मंदिर भगवान शिवाच्या शशिभूषण रूपाला आणि भगवान गणेशाच्या भीडभंजन रूपाला समर्पित आहे. हे फक्त एक धार्मिक स्थळ नाही तर आपल्या श्रद्धेचे केंद्र आहे.

चोरीला गेलेले शिवलिंग प्राप्त करून पुन्हा स्थापित करावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भाविकांनी प्रशासनाकडे केली आहे. पोलीस अधिकारी आकाश बार्सिया यांनी सांगितले की, मंदिरातील इतर सर्व वस्तू जगाच्या जागी होत्या, ज्यामुळे हे स्पष्ट होते की चोरीचा उद्देश फक्त शिवलिंग पळवून नेणे हा होता. हे शिवलिंग मिळवण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत आणि तपास सुरू आहे. कोणीतरी शिवलिंग समुद्रात लपवले असण्याची शक्यता आहे, म्हणून तज्ञ स्कूबा डायव्हर्स आणि पोहणाऱ्यांना बोलावले आहे. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा, विशेष ऑपरेशन्स ग्रुप (SOG) आणि फॉरेन्सिक तज्ञांचा सहभाग आहे. (हेही वाचा: Mahashivratri 2025: आज महाशिवरात्री दिवशी महाकुंभ मेळ्यातील शेवटचे शाही स्नान; 45 दिवसांच्या उत्सवाचा होणार समारोप, प्रयागराजमध्ये लाखो भाविक जमा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)