Viral Video: महाशिवरात्री हा भववान शंकर आणि पार्वतीचा विवाह सोहळा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरम्यान, महाशिवरात्रीदरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडिओमध्ये एक बैल शिव मंदिराबाहेर डोके खाली करून उभे असल्याचे दिसून येत आहे. @Ravitiwariii नावाच्या एक्स अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये भगवान शंकराच्या मंदिरासमोर एक बैल पुढचे पाय वाकवून डोके खाली करतो. जणू काही भगवान शंकराला वंदन करण्यासाठी नतमस्तक होताना दिसत आहे.हा व्हिडिओ महाशिवरात्रीला रेकॉर्ड करण्यात आला आहे की दुसर् या दिवशी, हे स्पष्ट झाले नसले तरी ज्यांनी हे दृश्य पाहिले ते मंत्रमुग्ध झाले. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक म्हणत आहेत की, बैलाने भगवान शंकराला नमन केले . सामान्यत: प्राण्यांच्या अप्रत्याशित वर्तनाचा अंदाज लावता येत नाही, कारण ते बऱ्याचदा त्यांच्या अनाकलनीय कृतींद्वारे सर्वांना आश्चर्यचकित करतात.
येथे पाहा, व्हायरल व्हिडीओ:
Show me More Adorable video on MahaShivRatri 😍🙏🏻🚩#HarHarMahadev pic.twitter.com/ztHGRNHAdB
— Ravi Tiwari🇮🇳 (@Ravitiwariii_) February 26, 2025
मंदिराबाहेर भगवान शंकराला वंदन करणारा बैल.
Show me More Adorable video on MahaShivRatri 😍🙏🏻🚩#HarHarMahadev pic.twitter.com/ztHGRNHAdB
— Ravi Tiwari🇮🇳 (@Ravitiwariii_) February 26, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)