Greater Noida Shocker: ग्रेटर नोएडामध्ये रात्रीच्या अंधारात बैलाची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जखमी
ग्रेटर नोएडामध्ये सुपरटेक ऑक्सफर्ड स्क्वेअरजवळ एका बैलाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाला.
Greater Noida Shocker: ग्रेटर नोएडामधील सेक्टर 16-बी येथील सुपरटेक ऑक्सफर्ड स्क्वेअरजवळ एका बैलाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात एक दुचाकीस्वार आपल्या लेनमध्ये सुसाट वेगाने जाताना दिसत आहे. तेवढ्यात एक काळ्या रंगाचा बैल दुचाकीसमोर येतो आणि त्याच्या दुचाकीला धडकतो. त्यानंतर दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटते आणि तो खाली पडतो. दुचाकीस्वार खाली पडल्याचे पाहताच बाजूला उभ्या असलेल्या लोकांनी त्याला मदत केली. त्या व्यक्तीला उठण्यास मदत केली. सुदैवाने त्या व्यक्तीला गंभीर दुखापत झाली नाही. या घटनेसंदर्भात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही, असे उत्तर प्रदेशातील बिसरख कोतवाली पोलिसांनी सांगितले.
ग्रेटर नोएडामध्ये रात्रीच्या अंधारात बैलाची दुचाकीला धडक
आवारा पशु बन रहे राहगीरों के लिए जानलेवा।
ग्रेटर नोएडा वेस्ट में सड़क पर सांड से टकराई बाइक, चालक घायल।@NBTDilli @OfficialGNIDA @myogiadityanath pic.twitter.com/2RyeXs5mac
— Siddharth Agarwal 🇮🇳 (@siddharth2596) November 15, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 16, 2024 04:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

