Anant Ambani Birthday 2025: रिलायन्स इंडस्ट्रीजचा संचालक अनंत अंबानीचा 30 व्या वाढदिवसानिमित्त संकल्प; करत आहे जामनगर ते द्वारका अशी 140 किमीची पदयात्रा (Video)
अनंत अंबानीने सांगितले की, त्याची पदयात्रा जामनगरमधील त्यांच्या घरापासून सुरू झाली. गेल्या काही दिवसांपासून हा प्रवास सुरू आहे, जो द्वारका इथे संपेल. सध्या याचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी सध्या चर्चेत आहे. अनंत अंबानी गुजरातमध्ये 140 किलोमीटरहून अधिक अंतराची पदयात्रा करत आहे. जामनगर ते द्वारकाधीश मंदिर अशी ही यात्रा आहे. अनंत अंबानीने सांगितले की, त्याची पदयात्रा जामनगरमधील त्यांच्या घरापासून सुरू झाली. गेल्या काही दिवसांपासून हा प्रवास सुरू आहे, जो द्वारका इथे संपेल. सध्या याचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. अनंत अंबानी म्हणाला, ‘गेल्या 5 दिवसांपासून ही पदयात्रा सुरू आहे आणि आम्ही आणखी 2-4 दिवसात पोहोचू. भगवान द्वारकाधीशाचे आशीर्वाद आम्हाला लाभो. मी तरुणांना सांगू इच्छितो की भगवान द्वारकाधीशांवर श्रद्धा ठेवा आणि कोणतेही काम करण्यापूर्वी भगवान द्वारकाधीशांचे स्मरण करा, काळजी करण्याची काहीच कारण नाही.’
अनंत अंबानीने 10 एप्रिल रोजी द्वारकेत भगवान द्वारकाधीशांचे दर्शन घेऊन त्याचा वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प केला आहे. अनंत अंबानींच्या या धार्मिक यात्रेदरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. त्यच्या प्रवासादरम्यान, संपूर्ण वाटेत पोलीस आणि खाजगी सुरक्षा एजन्सी त्याच्यासोबत असतात. (हेही वाचा: Chardham Yatra 2025: यंदा 30 एप्रिलपासून सुरु होणार चारधाम यात्रा; अक्षय्य तृतीयेला उघडणार गंगोत्री, यमुनोत्री धामचे दरवाजे)
Anant Ambani Birthday 2025:
#WATCH | Devbhumi Dwarka, Gujarat: Anant Ambani, Director, Reliance Industries Limited, is on a 'Padyatra' from Jamnagar to Dwarkadhish Temple
He says, "The padyatra is from our house in Jamnagar to Dwarka... It has been going on for the last 5 days and we will reach in another… pic.twitter.com/aujJyKYJDN
— ANI (@ANI) April 1, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 01, 2025 12:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

