Israel Hamas War: हमासच्या अल-कासम ब्रिगेडने रविवारी इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला. सोशल मीडियावर दिलेल्या निवेदनात हमासच्या संरक्षण शाखा अल-कसाम ब्रिगेड्सने ही कारवाई इस्रायली हत्याकांडाला प्रत्युत्तर म्हणून केली असल्याचे म्हटले आहे. नंतर इस्रायली सैन्याने कबूल केले की राफाह येथून 8 रॉकेट डागण्यात आले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, जानेवारीनंतर इस्रायलवर हमासने केलेला हा पहिला मोठा हल्ला मानला जात आहे. हमास अल-अक्सा टीव्हीने सांगितले की, गाझा पट्टीतून रॉकेट हल्ले करण्यात आले. रिपोर्टनुसार, इस्रायली सैन्याने अनेक शहरांमध्ये सायरन वाजवून संभाव्य हल्ल्याचा इशारा दिला होता.

गेल्या 5 महिन्यांपासून तेल अवीवमध्ये सायरनचा आवाज ऐकू आला नव्हता. अशा परिस्थितीत, आज अचानक सायरन वाजल्याबद्दल इस्रायली लष्कराने सुरुवातीला कोणतीही विशेष माहिती दिली नाही. मात्र नंतर त्यांनी 8 रॉकेट हल्ले करण्यात आल्याचे सांगितले. लष्कराने सांगितले की, रफाह येथून हल्ले मध्य इस्रायलकडे निर्देशित केले गेले. यातील अनेक हल्ले रोखण्यात त्यांना यश आले. दरम्यान, इस्रायलच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवेने म्हटले आहे की, त्यांच्याकडे कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. (हेही वाचा: Papua New Guinea Landslide: पापुआ न्यू गिनीमध्ये भूस्खलन; 670 हून अधिक नागरिकांचा बळी गेल्याचे वृत्त)

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)