माणुसकीला काळीमा फासेल असे एक प्रकरण उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातून समोर आले आहे. या ठिकाणी दारूच्या बाटल्यांनी भरलेला ट्रक नियंत्रणाबाहेर जाऊन एका झाडावर आदळला. या अपघातामध्ये ट्रकचालक जखमी झाला आणि ट्रकमधील दारूच्या बाटल्या रस्त्यावर पडल्या. मात्र तेथून जाणाऱ्या स्थानिक लोकांनी जखमींना रुग्णालयात नेण्याऐवजी दारूच्या बाटल्यांची लूट सुरू केली. काही लोकांनी याचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला. नंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचून त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर रस्त्यावरून वाहन हटवून रस्ता खुला करण्यात आला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जखमी चालक सुनील सांगतात की, ते काशीपूरहून टिहरी चंबाला दारू घेऊन जात होते. जटपुराजवळ एका डंपरने त्यांना धडक दिली. यानंतर ट्रक बाजूला जाऊन झाडावर आदळला. या अपघातात 15 लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. (हेही वाचा: Porsche vs Bike Race Accident: पोर्श कारसोबत रेस करत होता बाईकस्वार; पुढे काय घडलं? पहा व्हिडिओ)

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)