Jejuri-Morgaon Road Accident: जेजुरी-मोरगाव रस्ते अपघाताबाबत PM Narendra Modi यांनी व्यक्त केला शोक; मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर
जेजुरीहून बारामतीकडे जाणारी एक स्विफ्ट कार भरधाव वेगाने आली आणि उभ्या असलेल्या पिकअप टेम्पोला मागून जोरदार धडक दिली. या टेम्पोमधील काही व्यक्ती सामान उतरवत होत्या. या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला.
आज, 19 जून 2025 रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे जिल्ह्यातील जेजुरी-मोरगाव रस्त्यावर झालेल्या भीषण रस्ता अपघातात, मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींबद्दल शोक व्यक्त केला. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून, 5 ते 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. पंतप्रधानांनी प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये अनुग्रह रक्कम जाहीर केली आहे. हा अपघात बुधवारी, 18 जून 2025 रोजी सायंकाळी 6:45 वाजण्याच्या सुमारास किर्लोस्कर कंपनीजवळील श्रीराम ढाब्यासमोर घडला. यावेळी एका भरधाव स्विफ्ट कारने तिथे उभ्या असलेल्या पिकअप टेम्पोला जोरदार धडक दिली.
जेजुरीहून बारामतीकडे जाणारी एक स्विफ्ट कार भरधाव वेगाने आली आणि उभ्या असलेल्या पिकअप टेम्पोला मागून जोरदार धडक दिली. या टेम्पोमधील काही व्यक्ती सामान उतरवत होत्या. या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला, ज्यामध्ये 6 पुरुष, 1 महिला आणि 1 सहा वर्षांचा मुलगा यांचा समावेश आहे. याशिवाय, 5 जण गंभीर जखमी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 जून 2025 रोजी सकाळी X वर पोस्ट करत या अपघाताबद्दल तीव्र दुख व्यक्त केले.
Jejuri-Morgaon Road Accident:
Deeply saddened by the loss of lives due to a road accident on the Jejuri-Morgaon road in Pune, Maharashtra. Condolences to those who have lost their loved ones. May the injured recover soon.
An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each…
— PMO India (@PMOIndia) June 19, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 19, 2025 12:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

