Maharashtra Board SSC 10th Result 2024: महाराष्ट्र बोर्ड 10वीची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उद्या मोठा दिवस आहे. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MBSHSE) उद्या म्हणजेच, 27 मे रोजी दहावीचा निकाल जाहीर करणार आहे. अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल 27 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. 2024 च्या इयत्ता 10वी बोर्डाच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. निकाल जाहीर केल्यानंतर, विद्यार्थ्यांची मार्कशीट DigiLocker पोर्टल, digilocker.gov.in आणि त्याच्या मोबाइल ॲप्लिकेशनवर उपलब्ध करून दिली जाईल. विद्यार्थी त्यांचा आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांकाद्वारे लॉग इन करून निकाल तपासू शकतील. यावर्षी महाराष्ट्र बोर्डाची 10वीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 या कालावधीत झाली होती, ज्यामध्ये सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. (हेही वाचा: Maharashtra HSC Supplementary Exam: बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीचे अर्ज 27 मे पासून ऑनलाईन पद्धतीने भरता येणार; जाणून घ्या महत्वाच्या तारखा)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)