Maharashtra Board Exam Time Table 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा 2025 चे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. 12वी बोर्डाच्या परीक्षा 11 फेब्रुवारी ते 11 मार्च 2025 या कालावधीत होणार आहेत. याशिवाय इयत्ता 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून ती 17 मार्च 2025 पर्यंत चालणार आहे. महाराष्ट्र बोर्डाची परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. पहिली शिफ्ट सकाळी 11:00 ते दुपारी 2:00 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 3:00 ते संध्याकाळी 6:00 पर्यंत असेल. दहावीची परीक्षा पहिल्या दिवशी भाषेच्या पेपरने सुरू होईल आणि बारावीची परीक्षा इंग्रजीच्या पेपरने सुरू होईल.  महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वर जाऊन विद्यार्थी वेळापत्रक डाउनलोड करू शकतात. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे प्रवेशपत्र जानेवारी 2025 मध्ये जारी केले जाईल. महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हॉल तिकीट प्रसिद्ध केले जाईल. जे विद्यार्थी नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख द्वारे डाउनलोड करण्यास सक्षम असतील. बोर्ड परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी, विद्यार्थी त्यांच्या संबंधित शाळांशी संपर्क साधू शकतात. (हेही वाचा: CBSE Board Exam Date Sheet 2025: सीबीएससी बोर्डाने जाहीर केल्या इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेच्या तारखा; पहा वेळापत्रक)

इयत्ता 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा 2025 चे वेळापत्रक-

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)