आज महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेतलेल्या 12वी च्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. दुपारी 11 वाजता MSBSHSE कडून निकालाची आकडेवारी जाहीर केली जाईल. ज्यामध्ये शाखा आणि 9 मंडळांचा विभागनिहाय परीक्षेत उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांची टक्केवारी जाहीर केली जाईल तर दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना थेट ऑनलाईन निकाल पाहता येईल. अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in सह अन्य काही वेबसाईट, अॅप वर निकाल पाहता येणार आहे. त्यामुळे आता अवघ्या काही तासांची प्रतिक्षा उरली असताना विद्यार्थांची निकालाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. MSBSHSE 12th Results on DigiLocker: महाराष्ट्र बोर्डचा 12वीचा निकाल यंदा डिजीलॉकर वरही उपलब्ध; digilocker.gov.in, DigiLocker App वर असे पहा मार्क्स!
Exciting updates for Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education, Class XII 2024 students! Your results #comingsoon on https://t.co/tatAeli3Xs Stay tuned for the latest announcements! #Maharashtraboard #classxii #Result2024 pic.twitter.com/CMBSDSDztE
— DigiLocker (@digilocker_ind) May 20, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)