MSBSHSE 12th Results on DigiLocker: महाराष्ट्र बोर्डचा 12वीचा निकाल यंदा डिजीलॉकर वरही उपलब्ध; digilocker.gov.in, DigiLocker App वर असे पहा मार्क्स!
DigiLocker (PC - google play)

यंदाच्या बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल आज (21 मे) जाहीर होणार आहे. दुपारी बोर्डाच्या पत्रकार परिषदेमध्ये निकालाची माहिती दिल्यानंतर दुपारी 1 वाजता विद्यार्थी ऑनलाईन निकाल पाहू शकणार आहेत. यंदा MSBSHSE ची अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in सह अन्य थर्ड पार्टी वेबसाईट्स वर पाहता येणार आहे. पण यंदा पहिल्यांदाचा महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल डिजीलॉकर वरही उपलब्ध होणार आहे. DigiLocker App आणि वेबसाईट digilocker.gov.in यावर https://results.digilocker.gov.in मध्ये  विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.

MSBSHSE च्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांकडून 21 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान बोर्डाची बारावीची परीक्षा झाली आहे. आता त्याच्या निकालाची धाकधूक वाढली आहे. नक्की वाचा: Maharashtra Board HSC Result 2024: आज बारावीचा निकाल; दुपारी 1 वाजता mahresult.nic.in वर पहा गुण! 

DigiLocker कसा पहाल यंदा MSBSHSE HSC निकाल?

  • digilocker.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. किंवा Digilocker app ओपन करा.
  • डिजिलॉकर वर तुमचं अकाऊंट असेल तर साईन इन करा. पहिल्यांदाच अ‍ॅप वापरत असाल तर नव्या अकाऊंट साठी साईन अप करा.
  • बोर्डाच्या उपलब्ध लिस्ट मधून Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education म्हणजेच MSBSHSE ची निवड करा.
  • HSC Results चा पर्याय निवडा.
  • रोल नंबर सह तुम्हाला विचारले जाणारे तपशील टाका.
  • आता तुमचा निकाल स्क्रिनवर पाहता येईल. निकालाची प्रिंट किंवा कॉपी सेव्ह देखील करून ठेवता येईल.

दरम्यान तुम्ही निकालावर खूष नसाल तर verification.mh-hsc.ac.in च्या माध्यमातून तुम्ही गुण फेर पडताळणी, उत्तरपत्रिका फोटो कॉपी पाहू शकाल. आज केवळ ऑनलाईन निकाल असणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या कॉलेज, शाळांमध्ये नंतर मूळ निकालपत्रिकांचे वाटप केले जाईल.