Delhi Baby Care Center Fire: दिल्लीच्या शहादरामधील विहार येथील बेबी केअर न्यू बॉर्न हॉस्पिटलमध्ये शनिवारी रात्री लागलेल्या आगीत सहा निष्पाप बाळांचा मृत्यू झाला. अपघातावेळी एकूण 12 नवजात बालकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आग लागल्यावर पोलीस, अग्निशमन विभाग, रुग्णालयातील कर्मचारी आणि आसपासच्या लोकांनी कसेतरी रुग्णालयाच्या इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीतून सर्व 12 मुलांना बाहेर काढले आणि त्यांना पूर्व दिल्लीतील प्रगत एनआयसीयू रुग्णालयात दाखल केले.
या घटनेबाबत दिल्ली पोलिसांनी सांगितले की, बेबी केअर न्यू बॉर्न चाइल्ड हॉस्पिटलला जारी केलेला परवाना 31 मार्च रोजी संपला होता. या ठिकाणी केवळ 5 खाटांसाठी परवाना मंजूर होता, परंतु घटनेच्या वेळी 12 नवजात बालकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. निओ-नेटल इन्सेंटिव्ह केअरची गरज असलेल्या नवजात मुलावर उपचार करण्यासाठी इथले डॉक्टर पात्र नाहीत, कारण ते फक्त बीएएमएस (BAMS) पदवीधारक आहेत. रुग्णालयात कोणतेही अग्निशामक यंत्रे बसविण्यात आली नव्हती. तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत हॉस्पिटलमधून बाहेर पडण्याची कोणतीही सोय नाही. (हेही वाचा: Delhi New Born Baby Care Hospital Incident: आगीत 7 नवजात बालकांचा मृत्यू झाल्यानंतर दिल्लीतील बाल रुग्णालयाच्या मालकासह 2 जणांना अटक)
पहा पोस्ट-
Delhi New Born Baby Care Hospital incident | Delhi police says:
1. The license issued to the Baby Care New Born Child Hospital expired on March 31.
2. The license was allowed for 5 beds only, but at the time of the incident, 12 newborn children were admitted to the Hospital.…
— ANI (@ANI) May 26, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)