Ahmedabad Plane Crash: एअर इंडियाने मुंबई, दिल्ली, गुजरात आणि लंडन विमानतळांवर सुरु केली पीडितांच्या नातेवाईकांसाठी मदत केंद्रे

टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी 12 जून 2025 रोजी प्रत्येक मृताच्या कुटुंबाला 1 कोटी रुपये देण्याची घोषणा केली.

Ahmedabad Plane Crash: एअर इंडियाने मुंबई, दिल्ली, गुजरात आणि लंडन विमानतळांवर सुरु केली पीडितांच्या नातेवाईकांसाठी मदत केंद्रे
Air India | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

काल दुपारी अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून, लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया फ्लाइट AI171 च्या बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेने संपूर्ण देशाला हादरवले आहे. उड्डाणानंतर हे विमान अवघ्या काही सेकंदांत मेघानीनगर परिसरात कोसळले. या विमानात 242 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते, ज्यापैकी फक्त एक जण वाचला आहे. यासह परिसरातीलही अनेकांचा मृत्यू झाला आहे. या शोकांतिकेनंतर, एअर इंडियाने पीडितांच्या नातेवाईकांना मदत आणि माहिती देण्यासाठी अहमदाबाद, मुंबई, दिल्ली आणि लंडन (गॅटविक) विमानतळांवर विशेष सहाय्य केंद्रे स्थापन केली आहेत. ही केंद्रे नातेवाईकांच्या प्रवासाची सोय करत असून, त्यांना मानसिक आणि प्रशासकीय आधार देत आहेत.

दरम्यान, टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी 12 जून 2025 रोजी प्रत्येक मृताच्या कुटुंबाला 1 कोटी रुपये देण्याची घोषणा केली. याशिवाय, जखमींच्या वैद्यकीय खर्चाची जबाबदारी आणि बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या नष्ट झालेल्या निवासस्थानाच्या पुनर्बांधणीची मदतही टाटा समूह घेणार आहे. (हेही वाचा: Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद Air India चा अपघात भारतातील सर्वात महागडा विमान वाहतूक दावा ठरणार; संभाव्य 2,400 कोटी रुपयांची मागणी- Reports)

Ahmedabad Plane Crash:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 13, 2025 01:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).