Share Market: शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये 1800 पेक्षा अधिक अंकांची घसरण
Stock Market | | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

Stock Market Updates: शेअर बाजारात (Share Marke) आज (शुक्रवार, 26 फेब्रुवारी) मोठी खळबळ पाहायला मिळाली. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात (Stock Market) मोठी घसरण पाहायला मिळाली. मुंबई स्टॉक एक्सचेंज चा बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्स (Sensex) 1.800 अंकांनी घरसला. तर नॅशनल स्टॉक एक्सेंज चा इंडेक्स निफ्टी (Nifty ) 14.600 पर्यंत खाली आला. दुपारी 12.42 वाजेपर्यंत सेन्सेंक्समध्ये 1816.39 इंकांची घसरण पाहायला मिळाली. यानंतर सेन्सेंक्स 49.222.92 इतक्या पातळीवर ट्रेंण्ड करत राहिला.

दुपारी 1.08 वाजलेपासून सेन्सेक्समध्ये 1,647.93 अंक म्हणजेच 3.23 अंकांनी घररण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 49,391च्या पातळीवर होता. तर निफ्टी 484.55 अंक म्हणजेच 3.21 टक्के घसरणीसोबत 14,612.80 वर ट्रेण्ड करत होता. (हेही वाचा, Earn from Home Online: 'या' 5 मार्गाने तुम्ही घरी बसून पैसे कमवू शकता; जाणून घ्या काय करावं लागेल काम)

शेअर बाजार आज सुरुवातीपासूनच मोठ्या घसरणीपासून सुरु झाला. घरगुती बाजार उघडताच सेन्सेक्स 900 पेक्षाही अधिक अंकांनी घसरला. तर निफ्टी सुद्धा 14,800 इतक्या पातळीवर पसरला. 30 शेअरच्या बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्सच्या सर्व 30 शेअर लाल निशाणमध्ये खुले होते. ओपनिंग वेळी सेकन्सेक्स 917.24 अंक म्हणजेच 1.80 टक्के घरण पाहायला मिळाली. यानंतर BSE सेंसेक्स 50,122.07 च्या पातळीवर ट्रेंड करत राहिला. दुसऱ्या बाजूला NSE निफ्टी मध्ये 267.80 अंकांची म्हणजेच 1.77 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. या वेळ इंडेक्स 14,829.60 इतक्या पातळवर ट्रेण्ड करत होता.