Baby Elephant Viral Video | (Photo Credit - X)

Elephant Family Viral Video: प्रख्यात भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी सुप्रिया साहू हे सोशल मीडियावर त्यांच्या मनमोहक पोस्टसाठी नेहमीच चर्चेत असतात. खरेतर सोशल मीडियावर तीच त्यांची ओळख आहे. दरम्यान, वन्यजीव पोस्टसाठी प्रसिद्ध असलेल्या साहू यांनी नुकतीच तामिळनाडूमधील अनामलाई व्याघ्र प्रकल्पातील एक दृश्य एक्स हँडलवर सामायिक केले आहे. ज्यामध्ये एका हत्तीच्या पिल्लाला (Baby Elephant) त्याचे पालक आणि झुंडीतील सदस्य कशी सुरक्षा (Baby Elephant Z Class Security) प्रदान करतात याबाबत माहिती मिळते आणि पाहायलाही मिळते. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

लक्ष्यवेधी विशेष सुरक्षा

वन्यजीव छायाचित्रकार धनू पराण यांनी जंगलात टीपलेले हे 15 सेकंदाचे दृश्य वन्य प्राण्यांमधील एकजूट दर्शवते. तसेच जंगलात शांतपणे विश्रांती घेत असलेल्या हत्तीच्या कुटुंबाचे प्रेमळ आणि तितकेच निर्मळ दृश्य प्रकट करते. खास करुन हत्तीचे लहान पिल्लू आणि त्याला  दिली जाणारी विशेष सुरक्षा ही सर्वांचे लक्ष वेधून घेते आहे. हे दृश्य पाहून साहू यांनी या दृश्याचे वर्णन "Z वर्ग सुरक्षा" म्हणून केले आहे. (हेही वाचा, Thailand: Baby elephant पडले खड्यात, आईने जे केले ते पाहून डोळ्यात येईल पाणी, पाहा व्हिडीओ)

वन्यप्राणी आणि मानवी जीवनाचे साम्य यांचे प्रतिबिंब

आयएएस अधिकारी अधिकारी सुप्रिया साहू आपल्या पोस्टमध्ये लिहितात, हे दृश्य हत्ती आणि मानवांच्या कौटुंबिक बंधनांमधील उल्लेखनीय साम्य प्रतिबिंबित करते आणि तरुण बछड्याभोवती कुटुंबातील सदस्यांच्या आश्वासक उपस्थितीवर भाष्यही करते. व्हिडीओने सोशल मीडियावर झपाट्याने लोकांचे लक्ष केंद्रीत केले आहे. पोस्टवर वापरकर्त्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. (हेही वाचा, Viral Video: केअरटेकरचा हात हत्तीच्या पिल्लाने प्रेमाने पकडला, व्हिडिओ व्हायरल, पहा व्हिडिओ)

फॉरेस्ट टीमच्या प्रयत्नांचे कौतुक

व्हिडिओ पाहून एका वापरकर्त्याने म्हटले आहे की, हे दृश्य कायम कैद करुन ठेवण्यासारखे आहे. जे अनेक भावभावनांचे प्रतिबींब उमटवते. आणखी एका वापरकर्त्याने टिप्पणी केली, अशा सुंदर गोष्टी पाहण्याचे अद्भुत आणि दुर्मिळ, आश्चर्यकारक दृश्य आम्हाला दाखवल्याबद्दल धन्यवाद. दरम्यान, वापरकर्त्यांनी फॉरेस्ट टीमच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आणि भविष्यातील पिढ्यांमधील वन्यजीव जागरूकता एक साधन म्हणून व्हिडिओचे महत्वही अधोरेखीत केले. दरम्यान, या आधीही हत्तींची अशी अनेक मनमोहक दृश्ये सोशल मीडियावर व्हारल झाली आहेत.

व्हिडिओ

दरम्यान, हत्तीचे हे मनमोहक दृश्य अनेकांसाठी आनंददायी असले तरी अनेक वेळा हत्तीसोबत अतिशय करुण अशा घटनाही घडत असतात. अनेकदा हत्तींची शिकार केली जाते, केवळ मनोरंजन म्हणून हत्तीसोबत अघोरी कृत्य केले जाते. एका घटनेत तर हत्तीच्या सोंडेमध्ये फटाका फोडण्यात आला होता. ज्यामुळे एका हत्तीचा अतिशय वेदनेने तळमळून प्राण गेला. कधी हत्तींच्या दातांसाठी (हस्तीदंत) त्याची शिकार केली जाते. त्यामुळे असा घटनांकडेही काळजीपूर्वक पाहणे आणि आवाज उठवणे आवश्यक ठरते.