अशोक चव्हाणांचा राजीनामा मराठा समाज मागेल, भाजप मागणार नाही- चंद्रकांत पाटील
अशोक चव्हाण समाजाला न्याय देऊ शकत नाही, अशी भावना मराठा समाजात निर्माण झाली असेल तर ते त्यांचा राजीनामा मागतील. मी व्यक्तिश: किंवा भाजप अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याची मागणी करणार नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी स्पष्ट केलं आहे.