Maharashtra Monsoon Update: पुढील 3-4 तासांत रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गात समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता- IMD

Maharashtra Rains Update: महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावली असून अनेक जिल्ह्यांना पहिल्या पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. तसेच मागील 2-3 दिवस मुंबईसह कोकणात चांगला पाऊस झाला आहे. दरम्यान आजही राज्यात अनेक भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उत्तर कोकणात आज ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तर रत्नागिरी (Ratnagiri), रायगड (Raigad), सिंधुदुर्ग (Sidhudurg), गोवा (Goa), कर्नाटक (Karnataka), केरळ (Kerala) भागात पुढील 3-4 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबईचे हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर यांनी याबाबत ट्विटद्वारे माहिती दिली आहे.

दरम्यान मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात येत्या 13-14 जून रोजी अतिमुसळधार पावसाची शक्यता IMD कडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.हेदेखील वाचा- Maharashtra Monsoon Update: मुंबई, ठाण्यासह कोकणात पुढील 5 दिवसांत अतिमुसळधार पावसाचा इशारा; काळजी घेण्याचे IMD चे आवाहन

आज मुंबई आणि ठाण्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहे. पुढील काही दिवसही मुसळधार पावसाचे असणार आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा, त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आणि त्याचा पश्चिमेकडील प्रवास यामुळे पश्चिम किनारपट्टीवर पुढील 4-5 दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मुसळधार पावसासह जोरदार वारे देखील वाहतील. परिणामी मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पालघर (Palghar), रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg) या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.