Online Education Tips for Students: ऑनलाईन शिक्षण घेणे सोपे करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी खास टिप्स

ऑनलाईन शिक्षण घेण्यात नेमक्या कोणत्या अडचणीत आणि त्यावर मात करण्यासाठी आपण काय काळजी घेतली यासाठी काही खास गोष्टी

Online Education Tips for Students: ऑनलाईन शिक्षण घेणे सोपे करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी खास टिप्स
Online Education (PixaBay)

Online Education Tips for Students: जून महिना उजाडला सर्व शालेय विद्यार्थ्यांना लागते ती शाळेची ओढ... आपण कधी शाळेत प्रवेश करतो, आपल्या दोस्तांना भेटतोय, नव्या गोष्टी शिकतोय याची उत्सुकता असते. शाळेचा पहिला दिवस, नवी कोरी पुस्तके, नवा गणवेश, दप्तर या सर्व गोष्टींचे कुतूहल असते. मात्र कोरोनामुळे यंदाही अनेकांना ही सुरुवात ऑनलाईन शिक्षणापासूनच करावी लागत आहे. घरात बसून व्हिडिओ द्वारे ई लर्निंग करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांसाठी ही गोष्ट नवीन असली तरीही काही दिवस हे समजणे अवघड जाईल.

ऑनलाईन शिक्षण घेण्यात नेमक्या कोणत्या अडचणीत आणि त्यावर मात करण्यासाठी आपण काय काळजी घेतली यासाठी काही खास गोष्टी

  • इंटरनेट सुरळितरित्या सुरु आहे की नाही याची खात्री करुन घ्या

    कधी कधी पावसामुळे वा अन्य कारणामुळे इंटरनेट कनेक्शन जाते अशा वेळी व्यवस्थित खात्री करुन घ्या.

  • घरात जिकडे इंटरनेटला पुरेशी रेंज असेल त्या ठिकाणी ऑनलाईन शिक्षणासाठी बसा. ज्यामुळे काही तांत्रिक अडचण निर्माण होणार नाही.हेदेखील वाचा- RTE Admission 2021-22: आरटीई अंतर्गत खासगी शाळांतील 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया 11 जूनपासून सुरु
  • लॅपटॉप, मोबाईल पुरेसा चार्जिंग करा. ज्यामुळे कोणता व्यत्यय येणार नाही. जर तुमच्याकडे संगणक असेल तर तो नीट चालू करा.
  • पुरेसा प्रकाश असेल अशा ठिकाणी अभ्यासासाठी बसा
  • ऑनलाईन माध्यम असल्याने तांत्रिक अडचणी येऊ शकता त्यामुळे एखादा मुद्दा समजला नसेल तर पुन्हा शिक्षकांना तो विचारून नीट समजून घ्या.
  • खूप वेळ ऑनलाईन वर्ग असल्या कारणाने दुपारचे जेवण कमी करा. अन्यथा विद्यार्थ्यांना डुलकी लागू शकते.
  • मुद्दे लिहून घेण्यासाठी कागद, पेन, पेन्सिल जवळ ठेवा

वर दिलेल्या गोष्टींची व्यवस्थित काळजी घेतली तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अगदी सहजपणे शिक्षण घेऊ शकता.

(The above story first appeared on LatestLY on Jun 13, 2021 12:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).