Mika Singh चे KRK Kutta गाणे पाहून संतापला Kamal R Khan, मानहानीचा करणार दावा
Mika Singh Song on KRK (Photo Credits: YouTube)

आपल्या आवाजाची सर्वांवर भुरळ पाडणारा सुप्रसिद्ध गायक मीका सिंह (Mika Singh) सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. अनेक सुपरहिट गाणी देणारा मीका सिंह ने एक नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे. 'केआरके कुत्ता' असे या गाण्याचे बोल असून या गाण्यात मीका सिंहने कमाल खान (Kamal Khan) खूपच अवहेलना केली आहे. मीका आणि कमाल यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. मात्र या गाण्याने मीकाने आपल्या मनातील केआरकेविषयी उरली सुरलेली सर्व भडास काढली आहे. दरम्यान हे गाणे पाहून कमाल खान मात्र चांगलाच संतापला आहे. आपण याबाबत मानहानीचा दावा करणार आहोत असे त्याने म्हटले आहे.

कमाल खानने ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. मी मिका सिंहसह बिंदु दारा सिंह आणि संगीत दिग्दर्शक शारिब तोशी विरुद्ध कायदेशीररित्या कारवाई करणार आहोत असे कमाल खान म्हणाला आहे.हेदेखील वाचा- KRK ने सांगितले अक्षय कुमार चे भविष्य, म्हणाला, 'पैसे कमावण्यासाठी अभिनेत्याकडे 2-3 वर्ष शिल्लक'

पाहा KRK कुत्ता हे गाणे

मी या तिघांना कोर्टात बघून घेईन आणि याचे उत्तर गाण्यातूनच देईन असेही तो म्हणाला. मी ही असा एक व्हिडिओ बनवणार आहे. पण त्याआधी आपण कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे असे म्हटले आहे.

कमाल आर खान अनेक सेलिब्रिटीजवर सडकून टिका करत असतो. सलमानच्या राधे चित्रपटाबाबत त्याने खूपच वाईट पद्धतीने रिव्ह्यू दिल्यानंतर तो आता अनेक बॉलिवूड सेलेब्सच्या निशाण्यावर आला आहे.