KRA and Akshay Kumar (Photo Credits: FB)

आपल्या सडेतोड आणि वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असलेला अभिनेता कमाल खान (Kamal Khan) सध्या त्याच्या नव्या विधानामुळे चर्चेत आहे. यावेळी त्याने चक्क बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) याला टार्गेट केले आहे. "अक्षय कुमारकडे पैसे कमावण्यासाठी 2-3 वर्ष शिल्लक राहिले असून काही वेडे निर्माते चित्रपटासाठी 125 कोटी रुपये देतात" असे ट्विटद्वारे म्हटले आहे. कमाल राशिद खानने केलेल्या ट्वीटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

कमालने ट्वीटमध्ये अक्षयकडे आता पैसे कमावण्यासाठी दोन ते तीनवर्षच शिल्लक असल्याचे म्हटले आहे. 'अक्षय कुमारच्या चित्रपटाचे हक्क खरेदी करण्यासाठी कोणी मिळत नाही. त्याचा सूर्यवंशी आणि बेलबॉटम चित्रपट प्रदर्शित होऊ शकत नाही. तो एकापाठोपाठ एक नव्या चित्रपटांची घोषण करतोय. कारण आता पैसे कमावण्यासाठी अक्षयकडे 2 ते 3 वर्षच शिल्लक आहेत. वेडे निर्माते त्याला चित्रपटासाठी 125 कोटी रुपये देतात' या आशयाचे ट्वीट केले आहे.हेदेखील वाचा- Ram Setu Muhurat: अक्षय कुमार सह 'राम सेतु' चित्रपटाच्या टीम ने अयोध्येत जाऊन केला सिनेमाचा शुभारंभ

पाहा ट्विट:

केआरकेच्या या ट्वीटवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने तर तू अक्षय कुमारवर जळतोस का? असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने तुला काय वाटते हे कोणी विचारले आहे का? असे म्हणत सुनावले आहे.

अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. अक्षयचे एकापाठोपाठ एक चित्रपट प्रदर्शित होत असल्याचे पाहायला मिळते. 'सूर्यवंशी', 'बच्चन पांडे', 'बेलबॉटम' हे अक्षय कुमारचे चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.