Ram Setu Muhurat: अक्षय कुमार सह 'राम सेतु' चित्रपटाच्या टीम ने अयोध्येत जाऊन केला सिनेमाचा शुभारंभ
Ram Setu Muhurt (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड स्टार अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या त्याचा आगामी चित्रपट 'राम सेतू' (Ram Setu) चा शुभारंभ करण्यासाठी आपल्या टीमसह अयोध्येत पोहोचला आहे. अक्षय कुमार, जैकलीन फर्नांडीज (Jacqueline Fernandez) आणि नुसरत भरूचासह (Nusrat Bharucha) या चित्रपटाची टीम अयोध्ये नगरीत पोहचून त्यांनी भगवान रामाचे दर्शन घेतले आणि आपल्या राम सेतू चित्रपटाचा शुभारंभ केला. प्रभू श्रीरामाच्या चरणी आपल्या रामसेतू चित्रपटाचा बोर्ड ठेवून त्यांचे दर्शन घेऊन चित्रपटाचा शुभारंभ केला. त्यानंतर ते आपल्या टीमसह रामच्या पैडीजवळ गेले. मात्र लोकांची प्रचंड गर्दी झाल्यामुळे त्याला कारच्या बाहेर पडताच आले नाही.

लोकांनी अक्षय कुमारला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे त्यांच्या सुरक्षारक्षकांनी अक्षय कुमारला कारबाहेर येण्यास मनाई केली.हेदेखील वाचा- Ram Setu First Look Poster: अभिनेता अक्षय कुमार याने दीपावली चं औचित्य साधत शेअर केलं 'राम सेतु' चं पहिलं पोस्टर

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

त्यानंतर अक्षय कुमार अयोध्याचे राजा विमलेंद्र मोहन प्रताप मिश्र यांची भेट घेतली. त्यांना अक्षयला स्मृति चिन्ह आणि शाल देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी त्याचे चिरंजीव यतींद्र मिश्र देखील उपस्थित होते.

मागील वर्षी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत आले असता अक्षय कुमारने त्यांची भेट घेतली होती. दरम्यान,राम सेतूची सत्यता शोधण्यासाठी समोर आलेला अक्षय कुमार या चित्रपटातील नायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ज्यासाठी अक्षय कुमार आणि दिग्दर्शक अभिषेक शर्मा या चित्रपटाचे चित्रीकरण प्रत्यक्ष ठिकाणी करू इच्छित आहेत. ज्यामध्ये अयोध्या भगवान राम यांचे जन्मस्थान आहे. अक्षयने सीएम योगी आदित्यनाथ यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा केली आहे.