Ram Setu First Look Poster: अभिनेता अक्षय कुमार याने दीपावली चं औचित्य साधत शेअर केलं 'राम सेतु' चं पहिलं पोस्टर
Akshay Kumar In Ram Setu (Photo Credits: Twitter)

आज भारतामध्ये दिवाळीचा सण आहे. पौराणिक कथांनुसार, आजच्या दिवशीच भगवान श्रीराम अयोद्धेमध्ये परतले होते. त्यांचं स्वागत दिवे लावून केल्याने दिवाळीत रोषणाई करण्याची प्रथा आहे. पण आजच्या या दिवसाचा संदर्भ घेत बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar)  याने देखील त्याचा आगामी 'राम सेतु' (Ram Setu) सिनेमा जाहीर केला आहे. 'राम सेतु' चं अस्तित्त्व होतं की ती केवळ भ्रामक कल्पना आहे याबद्दल मतमतांतर आहेत. दरम्यान त्याच राम सेतुच्या शोधात फिरणार्‍या एका पटकथेवर अक्षय कुमारचा 'राम सेतु' हा सिनेमा आधारित आहे.

आज अक्षय कुमारने त्याची झलक असलेलं 'राम सेतु' चं पहिलं वहिलं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये अक्षय कुमारच्या गळ्यात एक भगवा स्टोल आहे. मागे समुद्र आणि श्रीरामाची प्रतिमा आहे. अक्षयने आज ट्वीटरवर सिनेमाची घोषणा करताना, ' या दिवाळीत रामाचं स्मरण करून त्याच्या काही विचारांनी भारताच्या आगामी पिढ्यांमध्ये 'राम' टिकून राहील असा एक सेतु बांधू.' असं म्हटलं आहे. केप ऑफ गुड फिल्म्स हा सिनेमा प्रस्तुत करणार आहे. तर अभिषेक शर्मा दिग्दर्शक आहे. Laxmii चित्रपट Torrent लीक झाल्याने युजर्सला फुकटात डाऊनलोड करण्यासह ऑनलाईन पाहता येणार; अक्षय कुमार याच्या नव्या हॉरर-कॉमेडी मुव्हीची पायरसी?

अक्षय कुमार ट्वीट

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षय कुमारचा 'लक्ष्मी' हा सिनेमा 9 नोव्हेंबरला डिस्ने प्लस हॉट्स्टार वर रिलीज झाला आहे. या सिनेमाला समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नसला तरीही ओटीटी वर सर्वाधिक युजर्सना घेऊन येण्यामध्ये हा सिनेमा यशस्वी ठरला आहे.