Laxmii चित्रपट Torrent लीक झाल्याने युजर्सला फुकटात डाऊनलोड करण्यासह ऑनलाईन पाहता येणार; अक्षय कुमार याच्या नव्या हॉरर-कॉमेडी मुव्हीची पायरसी?
Laxmii (Photo Credits-Twitter)

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar)  याचा लक्ष्मी  (Laxmii) हा चित्रपट अखेर OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे. तर 'लक्ष्मी बॉम्ब' (Laxmi Bomb) या चित्रपटाचे नाव बदलून ते आता फक्त लक्ष्मी ठेवण्यात आले आहे. तर लवकरच अक्षय याचा सुर्यवंशी (Suryavanshi) सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अक्षयचा हा हॉरर- कॉमेडी चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टारवर 9 नोव्हेंबर पासूनच पाहता येणार आहे. परंतु लक्ष्मी हा चित्रपट पायरसीच्या कचाट्यात सापडला आहे. टोरंटवर या चित्रटाच्या लिंकचा स्क्रिनशॉट इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. सरकारकडून पायरसी आणि टोरंट सारख्या वेबसाइटवर बंदी घालण्यासह कारवाई ही केली आहे.

पायरसी व्यतिरिक्त लक्ष्मी चित्रपट डाउनलोड करण्यासाठी विविध लिंक्स इंटरनेटवर उपलब्ध आहेत. लिंक्स सोबत टॅग्स सुद्धा वापरले गेले आहेत.त्यामध्ये Watch Laxmii in HD for free, Watch Laxmii online for free or download Laxmii अशा टॅग्सचा समावेश आहे. त्याचसोबत चित्रपट डाऊनलोडसाठी Laxmii Full Movie Download, Laxmii Full Movie Timlrockers, Laxmii Full Movie Telegram, Laxmii Telegram Links, Laxmii Full Movie HD Telegram सारखे टॅग्स वापरले आहेत.(Laxmii चित्रपट प्रदर्शित व्हायला केवळ 1 दिवस बाकी, अभिनेता अक्षय कुमार ने सोशल मिडियावर केले हटके पोस्ट)

चित्रपटांची पायरसी होऊ नये यासाठी काही पावले सुद्धा उचलली गेली आहेत. मात्र तरीही हॅकर्सकडून चित्रपटांची पायरसी करण्यासह ते ऑनलाइन पद्धतीने फुकटात पाहण्यासाठी उपलब्ध करुन देतात.(Laxmii: अक्षय कुमार याने चित्रपटाचे नाव बदलल्यानंतर शेअर केले पोस्टर, कियारा अडवाणी हिचा सुद्धा झळकला जबरदस्त लूक)

रिपोर्टनुसार, कोरोनाच्या काळात ऑनलाईन पायरसीचे प्रकार सर्वाधिक घडल्याचे दिसुन आले आहे. देशात मार्च महिन्याच्ा शेवटच्या आठवड्यातच ऑनलाईन पायरसीचे प्रमाण 62 टक्के वाढले. तर चित्रपटांची पायरसी करण्यामध्ये टोरंट आणि तमिळ रॉकर्स सारख्या वेबसाइटचा अधिक वापर केला जात असल्याचे दिसून आले आहे.

लक्ष्मी चित्रपटाचे दिग्दर्शन राघव लॉरेन्स याने केले असून तो तमिळ चित्रपट कंचना 2 चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात कियारा अडवाणी सुद्धा मुख्य भुमिकेत दिसून येणार आहे.