Laxmii चित्रपट प्रदर्शित व्हायला केवळ 1 दिवस बाकी, अभिनेता अक्षय कुमार ने सोशल मिडियावर केले हटके पोस्ट
Laxmii Movie (Photo Credits: Instagram)

गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेला खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट लक्ष्मी (Laxmii) उद्या (9 नोव्हेंबर) प्रदर्शित होणार आहे. सर्वांनाच या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. तृतीयपंथींवर आधारित या सिनेमाची कथा आहे. मात्र त्यात अनेक ट्विस्ट आहेत. मध्यंतरी हा चित्रपट वादाच्या भोव-यात अडकला होता. त्यामुळे आधी लक्ष्मी बॉम्ब असलेल्या या चित्रपटाचे नाव आता लक्ष्मी ठेवण्यात आले आहे. अक्षय कुमारने या चित्रपटाचे प्रमोशन करत उद्या हा चित्रपट ओटीटी प्लेटफॉर्मवर (OTT Platform) प्रदर्शित होईल अशी माहिती देत सोशल मिडियावर हटके पोस्ट केले आहे.

या पोस्टमध्ये अक्षय कुमारने 'तुमच्या घरी लक्ष्मीचा निवास होण्यासाठी आता केवळ 1 दिवस उरला आहे. तुम्ही तयार आहात का? असे म्हटले आहे. 9 नोव्हेंबरला हा प्रदर्शित होण्यासाठी हा चित्रपट सज्ज झाला आहे असेही तो म्हणाला आहे. हेदेखील वाचा- Lakshmi Bomb: अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी बॉम्ब' चित्रपटाच्या अडचणीत आणखी वाढ; हिंदू सेनेने माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकरांना पत्र लिहून 'या' मुद्द्यावरून केली तक्रार

हा चित्रपट उद्या OTT प्लेटफॉर्म डिस्नी प्लस हॉटस्टारवर (Disney Hotstar Plus) प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील 'बुर्ज खलिफा' हे गाणे सध्या प्रचंड गाजतय. त्यामुळे देखील या चित्रपटाची उत्सुकता अजून वाढलीय. अक्षय कुमारचा तृतीय पंथीयांचा अवतार पाहून अक्षय कुमार या चित्रपटात काही ना काही हटके करणार यात तिळमात्र शंका नाही.