Laxmii: अक्षय कुमार याने चित्रपटाचे नाव बदलल्यानंतर शेअर केले पोस्टर, कियारा अडवाणी हिचा सुद्धा झळकला जबरदस्त लूक
लक्ष्मी पोस्टर (Image Credit: Instagram)

Laxmii Poster: अभिनेता अक्षय कुमार याचा आगामी चित्रपट लक्ष्मी बॉम्ब ला जबरदस्त विरोध झाल्यानंतर दिग्दर्शकांनी चित्रपटाचे नाव बदलले आहे. त्यानंतर आता चित्रपटाचे नाव लक्ष्मी असे ठेवण्यात आले आहे. हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टारवर स्ट्रिमिंगसाठी उपलब्ध असणार आहे. तसेच प्रेक्षकांना हा चित्रप येत्या 9 नोव्हेंबर पासून पाहता येणार आहे. अशातच अक्षय कुमार याने चित्रपटाचे नाव बदलल्यानंतर पोस्टर रिलीज केले आहे. ज्यामध्ये अक्षय याच्या सोबत अभिनेत्री कियारा अडवाणी सुद्धा दिसून येत आहे. चित्रपटाचे हे पोस्टर अधिकच दमदार असून दर्शकांना ते पसंद नक्कीच पडू शकते.

लक्ष्मी बॉम्ब चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित केल्यानंतर याबद्दल प्रत्येकालच उत्सुकता लागली आहे. चित्रपटात अक्षयच्या भुमिकेवरुन खुपच चर्चा होत आहेत. अक्षयने स्वत: चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज केले आहे.(Laxmmi Bomb Renamed to Laxmmi: अक्षय कुमार याच्या लक्ष्मी बम सिनेमाच्या नावात बदल; 'लक्ष्मी' नावाने होणार प्रदर्शित!)

अक्षय कुमार याचा हा चित्रपट मुनी2: कंचना हिंदी रिमेक आहे. जो राघव लॉरेंस याने दिग्दर्शित केला आहे. तर अक्षयचा लक्ष्मी हा चित्रपट सुद्धा त्यानेच दिग्दर्शित केला आहे. यापुर्वी हॉरर कॉमेडी चित्रपट 22 मे रोजी चित्रपटागृहात प्रदर्शित होणार आहे. परंतु कोरोना व्हायरसमुळे चित्रपटाची प्रदर्शित तारीख निघून गेली. त्यानंतर मेकर्सनी हा चित्रपट OTT वर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला.