Laxmmi Bomb Renamed to Laxmmi: अक्षय कुमार याच्या लक्ष्मी बम सिनेमाच्या नावात बदल; 'लक्ष्मी' नावाने होणार प्रदर्शित!
Laxmmi Bomb Renamed to Laxmmi (Photo Credits: Twitter)

Laxmmi Bomb Renamed to Laxmmi: अक्षय कुमार (Akshay Kumar) चा बहुचर्चित सिनेमा 'लक्ष्मी बम' प्रदर्शनाच्या वाटेवर असताना वादात अडकल्याचे पाहायला मिळाले. सोशल मीडियावर उठलेल्या वादंगानंतर सिनेमाच्या नावात बदल करण्यात आला आहे. लक्ष्मी बम नावातून हिंदू देवी देवतांचा अपमान होतो. त्यामुळे नावात बदल करण्यात यावा, अशी मागणी सर्वच स्तरातून होत होती. त्यानंतर सिनेमाच्या नावात बदल करण्यात आला. त्यामुळे सिनेमाचे 'लक्ष्मी बम' हे नाव बदलून केवळ 'लक्ष्मी' असे ठेवण्यात आले आहे. बम हा शब्द सिनेमाच्या टायटलमधून हटवण्यात आला आहे.

सिनेमाचे सेन्सॉर प्रमाणपत्र घेऊन दिग्दर्शक राघव लॉरेन्स (Raghav Lawrence) आज सीबीएफसी (CBFC) येथे दाखल झाले होते, अशी चर्चा होती. प्रेक्षकांच्या भावना लक्षात घेत सिनेमाचे निर्माते शबीना खान, तुषार कपूर आणि अक्षय कुमार यांनी सिनेमाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला. (अक्षय कुमार आणि कियारा आडवाणी यांच्या लक्ष्मी बम सिनेमातील बुर्ज खलीफा गाणे रसिकांच्या भेटीला!, Watch Video)

पहा सिनेमाचा ट्रेलर:

'लक्ष्मी' हा सिनेमा 'मुनी 2: कंचना' या तामिळ सिनेमाचा रिमेक आहे. हा हॉरर कॉमेडी सिनेमा 9 नोव्हेंबर 2020 रोजी डिज्नी प्लस हॉटस्टार (Disney+ HotstarVIP)वर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातून अक्षय कुमार आणि कियारा आडवाणी ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिमेनाच्या पोस्टर प्रदर्शनापासून सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळेच सिनेमा प्रदर्शनानंतर अक्षय कुमारच्या या आगळ्यावेगळ्या भूमिकेला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहणे, औत्सुक्याचे ठरणार आहे.