Burjkhalifa Song (Image Credit: Instagram)

बॉलिवूडचा खिलाडी अशी ओळख असणाऱ्या अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) यांच्या 'लक्ष्मी बम' (Laxmmi Bomb) सिनेमाबद्दल प्रेक्षक उत्सुक आहेत. सिनेमाच्या ट्रेलर प्रदर्शनानंतर सोशल मीडियावर त्याची प्रचंड चर्चा झाली. आता सिनेमातील गाणे बुर्ज खलीफा (Burjkhalifa) रसिकांच्या भेटीला आले आहे. यात अक्षय-कियारा यांची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. उडत्या चालीचे हे गाणे ठेका ठरायला लावते, हे नक्की. (अक्षय कुमार ने बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणावर सोडले मौन, सर्वच यामध्ये सामील आहे असं म्हणणे चुकीचे सांगत मिडियाला केली 'ही' विनंती)

बुर्ज खलीफा हे गाणे दुबई मधील सुंदर ठिकाणी शूट करण्यात आले आहे. हे गाणे शशि-डीजे खुशी यांनी गायले आणि संगीतबद्ध केले आहे. गगन आहुजा यांनी हे गाणे लिहिले आहे. दरम्यान, या सिनेमाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता होती आणि ट्रेलर भेटीला आल्यानंतर सिनेमाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे. (यंदाच्या दिवाळीत अक्षय कुमार याच्या 'लक्ष्मी बम' चा धमाका; हॉरर-कॉमेडी सिनेमाचा ट्रेलर आऊट, Watch Video)

पहा व्हिडिओ:

9 ऑक्टोबर रोजी लक्ष्मी बम सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ट्रेलर रिलीज होताच 24 तासांत त्याला 70 मिलियन व्ह्युज मिळाले होते. 'लक्ष्मी बम' हा सिनेमा 'मुनी 2: कंचना' या तामिळ सिनेमाचा रिमेक आहे. राघव लॉरेंस यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. हा हॉरर कॉमेडी सिनेमा 22 मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. परंतु, कोरोना व्हायरस संकटामुळे प्रदर्शन लांबले. आता हा सिनेमा 9 नोव्हेंबर 2020 रोजी डिज्नी प्लस हॉटस्टार (Disney+ HotstarVIP) वरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.