Close
Advertisement
 
शुक्रवार, ऑक्टोबर 25, 2024
ताज्या बातम्या
20 minutes ago

VIDEO: राजस्थानच्या सिरोही पोलिसांची मोठी कारवाई, कारमधून अहमदाबादला पाठवले जाणारे 7 कोटी रुपये पोलिसांनी केले जप्त

राजस्थानच्या सिरोही पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान मोठी कारवाई केली आहे. दिल्लीहून गुजरातमधील अहमदाबादला पाठवले जाणारे 7 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. हवाला पैशाच्या माध्यमातून गाडीच्या सीटखाली एक खास प्रकारचा बॉक्स बनवला होता. ज्यामध्ये सीटखाली बॉक्समध्ये लपवून एवढी मोठी रक्कम पाठवली जात होती. पण अहमदाबादमध्ये डिलिव्हरी देण्यापूर्वी राजस्थान पोलिसांनी ही गाडी थांबवली आणि झडती घेतली, ज्यामध्ये सीटच्या खाली असलेल्या गुप्त बॉक्समधून हे पैसे सापडले.

राष्ट्रीय Shreya Varke | Oct 25, 2024 12:54 PM IST
A+
A-
(Photo Credits India Tv)

VIDEO: राजस्थानच्या सिरोही पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान मोठी कारवाई केली आहे. दिल्लीहून गुजरातमधील अहमदाबादला पाठवले जाणारे 7 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. हवाला पैशाच्या माध्यमातून गाडीच्या सीटखाली एक खास प्रकारचा बॉक्स बनवला होता. ज्यामध्ये सीटखाली बॉक्समध्ये लपवून एवढी मोठी रक्कम पाठवली जात होती. पण अहमदाबादमध्ये डिलिव्हरी देण्यापूर्वी राजस्थान पोलिसांनी ही गाडी थांबवली आणि झडती घेतली, ज्यामध्ये सीटच्या खाली असलेल्या गुप्त बॉक्समधून हे पैसे सापडले. या प्रकरणाची माहिती देताना पोलीस अधिकारी सीताराम यांनी सांगितले की, एसपी अनिल बेनिवाल यांच्या सूचनेवरून गुरुवारी राजस्थान-गुजरात सीमेवर असलेल्या मावळ चौकीवर नाकाबंदी करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी एक कार अडवली. गाडीची झडती सुरू केली असता, पोलीस तपासात कारच्या ड्रायव्हर सीटजवळील सीटखाली तिजोरीसारखी पेटी आढळून आली. पोलिसांनी तिजोरी उघडली असता कारच्या सीटखाली असलेली तिजोरी ५००-५०० रुपयांच्या नोटांच्या बंडलांनी भरलेला बॉक्स आढळला.

कारमधून 7 कोटींची रोकड जप्त

पैसे मोजण्यासाठी 4 तास लागले:

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेले पैसे मोजण्यासाठी पोलिसांना मशीन मागवावी लागली. पैसे मोजण्यासाठी सुमारे 4 तास लागले.

पैशांसह दोघांना अटक

या प्रकरणी सिरोही पोलिसांनी दोघांना पैशांसह अटकही केली आहे. या पैशांबाबत कोणाकडे चौकशी केली जात आहे. दिल्लीतून चालणाऱ्या हवाला व्यवसायाशी संबंधित असलेल्या लिंकची माहिती गोळा करण्यात पोलीस व्यस्त आहेत.


Show Full Article Share Now