Akshay kumar (Photo Credit - File Photo)

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) नुकताच आपल्या आगामी 'बेल बॉटम' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करुन लंडनहून भारतात परतला आहे. हा पहिला भारतीय चित्रपट आहे ज्याने कोरोना व्हायरस महामारीच्या काळातच याचे शूटिंग सुरु करुन ते पूर्ण केले. मुंबईत परतल्यानंतर अक्षय कुमारने सध्या सुरु असलेल्या बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन (Bollywood Drugs Case) यावर भाष्य करत एक व्हिडिओ शेअर केला आहे. 'आज मी थोड्या जड अंत:करणाने तुमच्याशी बोलत आहे. सध्या सुरु असलेल्या गोष्टीवरून काय बोलू आणि कसं बोलू हेच कळतं नाही. कारण आजूबाजूला फार निगेटिव्ही आहे. आम्ही भलेही स्टार्स अजून पण बॉलिवूड मात्र तुमच्या प्रेमाने बनले आहे' असे अक्षय कुमारने सांगितले आहे.

आम्ही केवळ एक इंडस्ट्री नाही तर आम्ही चित्रपटांमधून देशातील संस्कृती जगभरात पोहोचवत आहोत. तुम्हाला जे जे वाटतं ते ते आम्ही आमच्या चित्रपटातून मांडतो मग ते बेरोजगारी असे, भ्रष्टाचार असो वा गरीबी. अशा मध्ये जर आज तुमच्या भावना दुखावल्या असतील आणि तुम्ही रागावला असाल तर तुमचा तो रागही आम्ही झेलू. सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर अनेक प्रकरणे समोर आली. ते ऐकून आम्हालाही तितकचे दु:ख झालं जितके तुम्हाला. यावरून आम्हाला आमचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. असेही अक्षय म्हणाला. Sushant Singh Rajput Case: सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा चौकशी अहवाल सीबीआयने सार्वजनिक करावा; महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची मागणी

'त्यामुळे मी माझ्या हृदयावर हात ठेवून कसं खोट बोलू की ही समस्या नाही बॉलिवूडमध्ये. ड्रग्ज ही समस्या आहे. मात्र या इंडस्ट्रीतले सर्वच सामील आहेत असं होऊ शकत नाही. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. जे या प्रकरणाचा योग्य तो तपास करेल. आणि मला विश्वास आहे इंडस्ट्रीतील प्रत्येक जण यात सहकार्य करेल. मात्र या सर्वासाठी पूर्ण इंडस्ट्रीला बदनाम करणे चुकीचे आहे.' असेही तो म्हणाला.

माझा मिडियावर प्रचंड विश्वास आहे. जे योग्यवेळी योग्य मुद्दे उचलल्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले. त्यामुळे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले हे काम सुरुच ठेवावे. मात्र थोडे सांभाळून आणि विचार करुन. कारण एखादी नकारात्मक बातमी एखाद्याच्या आयुष्यभरच्या मेहनतीवर पाणी फिरवू शकते. त्यांना बरबाद करु शकतो. शेवटी एवढेच सांगतो तुम्हाला आमच्यावर राग असेल तर तो आम्ही आणखी मेहनत करुन दूर करू. तुमचा विश्वास पुन्हा जिंकू. तुम्ही आहात तर आम्ही आहोत. त्यामुळे तुमची ही साथ कायम राहू दे असेही अक्षय कुमारने या व्हिडिओत म्हटले आहे.