Laxmmi Bomb Trailer: यंदाच्या दिवाळीत अक्षय कुमार याच्या 'लक्ष्मी बम' चा धमाका; हॉरर-कॉमेडी सिनेमाचा ट्रेलर आऊट (Watch Video)
अक्षय कुमार याच्या लक्ष्मी बम सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. हटके कथा असलेल्या या सिनेमाचे यापूर्वी पोस्टर रिलिज झाले होते. पोस्टरमधील अक्षय कुमारच्या लूकने सिनेमाबद्दल बरीच चर्चा होत होती.
अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्या 'लक्ष्मी बम' (Laxmmi Bomb) सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. हटके कथा असलेल्या या सिनेमाचे पोस्टर यापूर्वी रिलिज झाले होते. पोस्टरमधील अक्षय कुमारच्या लूकने सिनेमाबद्दल बरीच चर्चा होत होती. आता सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये अक्षय कुमार याचा अनोखा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. अक्षय कुमारने ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या सिनेमात अक्षय कुमार सह कियारा आडवाणी (Kiara Advani) प्रमुख भूमिकेत आहे.
"जिथे कुठे असाल तिथेच थांबा आणि लक्ष्मी बम चा ट्रेलर पाहण्यासाठी तयार व्हा! कारण... बरसने आ रही हैं लक्ष्मी!," असे लिहित अक्षय कुमार याने सिनेमाचा ट्रेलर शेअर केला आहे. फन आणि फियर यांचा मेळ आपल्याला सिनेमातून पाहायाला मिळणार, हे ट्रेलरवरुन स्पष्ट होते. कियारा-अक्षयची केमिस्ट्री हा यातील इंस्टरेस्टिंग विषय असेल. ट्रेलरमध्ये त्याची छोटीशी झलक नक्कीच पाहायला मिळते. (तृतीयपंथींयांसाठी सुरु करण्यात आलेल्या देशातल्या पहिल्या शेल्टर होमसाठी खिलाडी अक्षय कुमार ने केली दीड कोटीची मदत)
पहा ट्रेलर:
Jahan kahi bhi hain, wahi ruk jaayyein aur taiyyaar ho jaayyein dekhne #LaxmmiBomb ka trailer, kyunki barasne aa rahi hai Laxmmi! #LaxmmiBombTrailer out now. #YeDiwaliLaxmmiBombWali! 💥
#FoxStarStudios #DisneyPlusHotstarMultiplex @advani_kiara @offl_Lawrence pic.twitter.com/oJM6YljkBX
— Akshay Kumar (@akshaykumar) October 9, 2020
अक्षय कुमार याचा 'लक्ष्मी बम' हा सिनेमा 'मुनी 2: कंचना' या तामिळ सिनेमाचा रिमेक आहे. हा तामिळ सिनेमा राघव लॉरेंस यांनी दिग्दर्शित केला होता आणि 'लक्ष्मी बम'चे दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे. हॉरर कॉमेडी सिनेमा 22 मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. परंतु, कोरोना व्हायरस संकटामुळे प्रदर्शन लांबले आणि लक्ष्मी बम हा सिनेमा ओटीटी फ्लॅटफॉर्मवर रिलिज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. 9 नोव्हेंबर 2020 रोजी डिज्नी प्लस हॉटस्टार (Disney+ HotstarVIP) वरुन हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कायम विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अक्षय कुमार याचा हा आगळावेगळा अंदाज प्रेक्षकांना कितपत भावतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Oct 09, 2020 01:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

