तृतीयपंथींयांसाठी सुरु करण्यात आलेल्या देशातल्या पहिल्या शेल्टर होमसाठी खिलाडी अक्षय कुमार ने केली दीड कोटीची मदत
Akshay Kumar (Photo Credits: Facebook)

सामान्यांप्रमाणे तृतीयपंथींयांना देखील हक्काचा निवारा मिळावा यासाठी तामिळनाडूत देशातील पहिले शेल्टर होम सुरु करण्यात आले आहे. यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे सरसावल्या. त्याप्रमाणे खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) यानेही या शेल्टर होमसाठी मदत देऊ केली आहे. अक्षयच्या आगामी चित्रपट 'लक्ष्मी बम' (Laxmmi Bomb) चे दिग्दर्शक राघव लॉरेन्स (Raghava Lawrence) आणि अक्षय कुमार यांनी या कामाकरिता पुढाकार घेतला ज्यात अक्षयने यासाठी दीड कोटीची मदत देऊ केली आहे. अक्षयचे सामाजिकतेचे व्रत त्याच्या चित्रपटांसह त्याच्या सामाजिक कामातून ही दिसून येते. मात्र हे योगदान खूपच महत्त्वाचे असे सांगण्यात येत आहे.

दिग्दर्शक राघव यांनी फेसबुकवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. त्यासोबत त्यांनी एक फोटोही पोस्ट केला आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार ट्रान्सजेंडर्ससोबत दिसत आहे.

पाहा फेसबुक पोस्ट:

 

“हॅलो दोस्तो आणि फॅन, मी तुमच्यासोबत एक आनंदाची गोष्ट शेअर करणार आहे. अक्षय कुमारने भारतातील पहिले ट्रान्सजेंडर होम तयार करण्यासाठी दीड कोटी रुपये दान केले आहेत”, असं या पोस्टमध्ये राघव यांनी सांगितले. Laxmmi Bomb: 'लक्ष्मी बॉम्ब' चे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर, दिग्दर्शकांनी 'या' कारणामुळे सोडला चित्रपट

राघव म्हणाले, “लक्ष्मी बमच्या शुटिंग दरम्यान अक्षय ट्रस्टचे प्रोजेक्ट आणि ट्रान्सजेंडर यांच्या घराबद्दल ऐकत होता. या प्रोजेक्टबद्दल एकल्यानंतर तातडीने अक्षयने त्यांच्या घरासाठी दीड कोटी रुपये दान करणार असल्याचे मला सांगितले. जे कुणी मदतीसाठी पुढे येतात त्यांना मी देवासारखा मानतो. यासाठी अक्षय कुमार माझ्यासाठी देव आहेत. मी या प्रोजेक्टसाठी त्यांनी साथ दिल्यामुळे त्यांचे आभार मानतो.” असेही या पोस्टमध्ये म्हटले आहे.

लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट तामिळ मधील कंचना चित्रपटाचा रिमेक आहे. तसेच अक्षय कुमार सोबत कियारा अडवाणीसुद्धा मुख्य भुमिकेत दिसून येणार आहे. पुढील वर्षी 5 जून 2020 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.