Laxmmi Bomb Movie (Photo Credits-Twitter)

Laxmmi Bomb: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा आगामी चित्रपट 'लक्ष्मी बॉम्ब' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच 18 मे रोजी या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. तत्पूर्वी पोस्टर प्रदर्शित केल्याच्या अवघ्या काही तासानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक राघव लॉरेंस (Raghava Lawrence) यांनी चित्रपट सोडत असल्याचा निर्णय जाहीर केला. तर लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट सोडण्यामागील त्यांनी त्याचे कारण स्षष्ट केले आहे. मात्र अक्षय कुमार याला दिग्दर्शकांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल कोणताही आक्षेप नसल्याचे सांगण्यात येत आहे.

राघव यांनी लक्ष्मी बॉम्ब चित्रपट सोडण्यामागचे कारण ट्वीट करत स्पष्ट केले आहे. त्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, चित्रपटासंबंधित क्रिएटिव्ह कामासाठी घेतलेल्या निर्णयाशी नाराज आहे. तसेच माझ्या परवानगी शिवाय या चित्रपटाचे फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व गोष्टींमध्ये व्यक्तीचा स्वाभिमान सुद्धा महत्वाचा असतो असे सुद्धा ट्वीट मध्ये आपले मत स्पष्ट केले आहे. (Laxmmi Bomb First Look Poster: 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमाचे पोस्टर आऊट; अक्षय कुमार अनोख्या भूमिकेत)

तर लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट तामिळ मधील कंचना चित्रपटाचा रिमेक आहे. तसेच अक्षय कुमार सोबत कियारा अडवाणीसुद्धा मुख्य भुमिकेत दिसून येणार आहे. पुढील वर्षी 5 जून 2020 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.