Laxmmi Bomb First Look Poster: 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमाचे पोस्टर आऊट; अक्षय कुमार अनोख्या भूमिकेत
Akshay Kumar (Photo Credits: Twitter)

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या त्याच्या 'गुड न्यूज' (Good News) आणि 'सूर्यवंशी' (Sooryavanshi) या दोन आगामी सिनेमांमध्ये व्यस्त आहे. याचदरम्यान अक्षयने त्याच्या एका नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. 'लक्ष्मी बॉम्ब' (Laxmmi Bomb) असे या सिनेमाचे नाव असून या सिनेमात अक्षय कुमार आपल्याला आगळ्यावेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात अक्षयला एका ट्रान्सजेंडर भूताने पछाडलेले असते. या सिनेमाचे पहिले पोस्टर अक्षयने सोशल मीडियावर शेअर केले आहे.

सिनेमाचे पोस्टर शेअर करत अक्षयने लिहिले की, "बॉक्स ऑफिसवर धमाकेदार सिनेमा घेऊन येत आहे. या सिनेमात माझ्यासोबत कियारा अडवाणी झळकेल. 5 जून 2020 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होईल."

अक्षय कुमार याचे ट्विट:

'गुड न्यूज' सिनेमात देखील अक्षय कुमार कियारा अडवाणी सोबत स्क्रिन शेअर करणार आहे. त्यानंतर 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमातही ही जोडी एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'कंचना 2' या तामिळ सिनेमाचा रिमेक असणाऱ्या 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमाचे दिग्दर्शन राघव लॉरेंस करत आहेत.