कियारा अडवानी हिचा हस्तमैथून सीन पहिला आणि तिच्या आजीच्या चेहऱ्यावरील उडाले भाव
'लस्ट स्टोरीज'मध्ये कियारा अडवाणी (Photo Credits: Youtube)

सध्या टीव्हीवर जो कंटेंट दाखवला जातो त्यावर अनेक बंधने असतात, त्यामुळे सेन्सॉर करूनच तो प्रसारित होतो. याच करणारे आज वेबसीरीज अथवा वेबफिल्म्सचा सुकाळ चालू आहे. कियारा अडवाणी (Kiara Advani) ने नेटफ्लिक्स (Netflix) ची वेबसीरीज 'लस्ट स्टोरीज' (Lust Stories) मध्ये एक हस्तमैथूनाचा (Masturbation) शॉट दिला होता. या सीनची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. काहींनी कियाराच्या बोल्ड स्टेपला दाद दिली तर काहींनी तिला ट्रोलदेखील केले.

सर्वात महत्वाचे म्हणजे कियाराच्या कुटुंबियांची याबाबत काय प्रतिक्रिया असेल? याबाबत खुद्द कियाराने उलगडा केला आहे. विशेषतः तिच्या आजीला हा सीन पाहून काय वाटले ते कियाराने नमूद केले आहे.

कियाराने मीडियाला सांगितले, ‘माझी आजी जेव्हा येथे राहायला आली होती, यावेळी, लस्ट स्टोरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. माझ्यासह माझ्या आई वडिलांनी ती पहिली होती, आणि त्यांना ती आवडली देखील होती. या सीरीजमध्ये मास्टरबेशन सीन असणार याची त्यांना आधीच कल्पना होती.’

(हेही वाचा: स्त्रियांनो, हस्तमैथुन करण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे, विवाहीत महिलांनाही ठरते फायदेशीर)

पुढे ती म्हणजे, ‘माझी आजी अँग्लो-इंडियन आहे, त्यामुळे तिने ही सीरीज पाहण्यास सुरुवात केली तेव्हा तिला यातील बराचसा भाग समजला नसल्याचे लक्षात आले. मास्टरबेशन सीनही ती चेहऱ्यावर कोणताही भाव न ठेवता पाहत होती, त्यामुळे तिला हे आवडले आहे का नाही हे मला समजले नाही. नंतर मी आईला मेसेज करून आजीला ही सीरीज समजावून सांगण्याबद्दल सुचवले.’ दरम्यान, लवकरच कियारा संदीप वंगाच्या ‘कबीर सिंह’ या चित्रपटामध्ये शाहिद कपूरसह दिसणार आहे. हा चित्रपट  21 जून 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे.