
Happy Diwali Padwa Marathi Wishes: दिवाळीच्या सणामधील दिवाळी पाडवा (Diwali Padwa) हा यंदा 2 नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे. दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने नव्या आणि शुभ कार्यांची सुरूवात केली जाते. व्यापारी वर्ग नव्या वर्षाची सुरूवात या दिवसाचं औचित्य साधून करत असतात. दिवाळी हा सण भारतात सर्वत्र धूमधडाक्यात साजरा होत असला तरीही त्याच्याशी निगडीत परंपरा या प्रत्येक भागात वेगवेगळ्या आहेत त्यामुळे सणासोबत सेलिब्रेशनही बदलते. महाराष्ट्रात हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. मग अशा या पवित्र दिवशी तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना, आप्तेष्टांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा देत त्यांचा हा दिवस अजून थोडा खास करा. दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा WhatsApp Messages, Stickers, Greetings, Images, Quotes शेअर करत करा आणि या दिवसाचा आनंद द्विगुणित करायला विसरू नका.
दिवाळी पाडवा हा सण बलिप्रतिपदा म्हणूनही ओळखला जातो. कार्तिक शुद्ध प्रतिपदेच्या या दिवशी अभ्यंगस्नानाची रीत आहे. पती-पत्नीच्या नात्याला देखील साजरा करणारा हा सण आहे. पत्नी पतीचं या सणाच्या निमित्ताने औक्षण करते आणि पती तिला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देतो. नक्की वाचा: Diwali Padwa Messages 2024: दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा साथीदारा सोबत शेअर करण्यासाठी खास मराठमोळी Wishes, Greetings.
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा





दिवाळी पाडवा हा दिवाळीच्या सणांमधील एक महत्त्वाचा दिवस आहे. मध्य आणि उत्तर भारतात दिवाळी पाडव्याला नवीन विक्रम संवत् सुरू होतो. यंदा विक्रम संवत 2081 ची सुरूवात 2 नोव्हेंबर पासून होणार आहे.