Happy Diwali Padwa: दिवाळीच्या सणामध्ये बलिप्रतिपदेला (Balipratipada) साजरा केला जाणारा दिवाळी पाडवा (Diwali Padwa) हा महत्त्वाचा सण आहे. नवदांपत्यांसाठी लग्नानंतर येणार्‍या पहिल्या पाडव्याचं विशेष आकर्षण असतं. या सणाच्या निमित्ताने एकमेकांमधील नातं अधिक दृढ करण्याचं, प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस असल्याने दिवाळी पाडवा निमित्त पत्नी पतीचं औक्षण करून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. पती देखील पत्नीला ओवाळणी म्हणून काही खास गोष्टी भेटवस्तू म्हणून देतात. मग हा दिवस अजून थोडा खास करण्यासाठी सोशल मीडीया मध्ये WhatsApp Stickers, Status, Facebook Messages, Quotes, Greetings शेअर करत हा दिवस अजून थोडा खास करू शकता.

दिवाळीच्या निमित्ताने पती-पत्नीच्या नात्याला स्पेशल करणारा दिवाळीतला पाडवा हा एक दिवस आहे. दिवाळी पाडवा हा हिंदू धर्मीयांसाठी खास आहे. साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक दिवाळी पाडवा असल्याने त्याचे महत्त्व अधिक आहे. या निमित्ताने सोनं खरेदी देखील मोठ्या उत्साहात केली जाते.

दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

Diwali Padwa Wishes | File Image
 तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या नात्यासाठी पाडवा हा खास
दिवाळी पाडव्याच्या गोड शुभेच्छा
Diwali Padwa Wishes | File Image
सप्तजन्मीचे सात वचन, साथ देणार तुला कायम
तुझ्या प्रेमाचीच ओढ राहील कायम
दिवाळी पाडव्याच्या मनापासून शुभेच्छा!
Diwali Padwa Wishes | File Image
दुःखाची सावलीही तुझ्याजवळ न येवो
चेहरा तुझा कायम असाच हसरा राहो
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Diwali Padwa Wishes | File Image
वर्षामागून वर्ष जाती, बेत मनीचे तसेच राहती
 तुझी साथ कधी न सुटावी हीच इच्छा कायमस्वरूपी मनी
 दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Diwali Padwa Wishes | File Image
 पहिला दिवा लागेल दारी, सुखाचा किरण येईल घरी
पूर्ण होवोत तुमच्या साऱ्या इच्छा, हीच कामना माझ्या मनी
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
दिवाळी पाडवा यंदा 2 नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे. संध्याकाळच्या वेळेस पत्नी पतीचं औक्षण करते आणि हा आनंदाचा दिवस साजरा केला जातो.