दिवाळी पाडवा (Diwali Padwa) हा दिवाळीच्या दिवसांमधील प्रमुख सणांपैकी एक दिवस आहे. हिंदू धर्मात असलेल्या साडेतीन शुभ मुहूर्तांमधील अर्धा मुहूर्त म्हणजे हा दिवाळी पाडव्याचा दिवस आहे. त्यामुळे देशभर हिंदू बांधव हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने नवी खरेदी केली जाते. घर, गाडी, सोनं खरेदीचा देखील हा एक महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे आजच्या दिवाळी पाडव्याच्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा मराठमोळी Greetings, WhatsApp Status, Wishes, Quotes, Messages द्वारा शेअर करत करू शकता.
दिवाळी च्या निमित्ताने एकमेकांना भेटवस्तू दिल्या जातात. आजच्या दिवशी सम्राट विक्रमादित्याने निर्माण केलेल्या कॅलेंडरचा पहिला दिवस असल्याने नववर्षाची सुरूवात देखील साजरी केली जाते. गुजरात आणि महाराष्ट्रात नव्या विक्रम संवत्सराची सुरुवात कार्तिक शुद्ध प्रतिपदेला म्हणजे दिवाळीतल्या पाडव्याच्या दिवशी होते. त्यामुळे हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नक्की वाचा: Diwali Padwa Messages 2024: दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा साथीदारा सोबत शेअर करण्यासाठी खास मराठमोळी Wishes, Greetings .
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
पती-पत्नीच्या नात्यासाठी दिवाळी पाडवा हा सण खास असतो. या दिवशी पतीचं औक्षण केले जाते. पती त्याच्या पत्नीसाठी ओवाळणी देतो. तिला खास वस्तू भेट म्हणून देतो. मग अशा या नात्याला खुलवणार्या सणाचा आनंद द्विगुणित करायला विसरू नका.