Doctors Death Cases in India: कोरोना महामारीत माणसातील देव बनून रुग्णांची अहोरात्र सेवा करणा-या डॉक्टरांवर देखील कोरोनाने जोरदार प्रहार केला आहे. या रुग्णांची सेवा करता करता अनेक डॉक्टरांना या रोगाची लागण होऊन आपला जीव गमवावा लागला आहे. IMA ने दिलेल्या ताज्या अपडेट्सनुसार, भारतात आलेल्या कोरोनाच्या दुस-या लाटेत 719 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. ही खूपच धक्कादायक आकडेवारी असून रुग्णांसाठी देवदूत ठरलेल्या डॉक्टरांचा नाहक बळी गेला आहे. यात सर्वाधिक डॉक्टर बिहारमधले (Bihar) आहेत. बिहारमध्ये मृत पावलेल्या डॉक्टरांची संख्या 111 इतकी आहे.
बिहार पाठोपाठ नवी दिल्लीत डॉक्टरांच्या मृतांचा आकडा हा 100 पार गेला आहे. नवी दिल्लीत 109 डॉक्टर्स दगावले आहेत. पाँडिचेरीमध्ये सर्वात कमी म्हणजे एका डॉक्टराचा मृत्यू झाला आहे.हेदेखील वाचा- Covishield लसीच्या दोन डोसेस मधील अंतर बदलणं कितपत योग्य? Niti Aayog ने दिले 'हे' स्पष्टीकरण
पाहूया राज्यनिहाय कोरोनाच्या दुस-या लाटेत मृत पावलेल्या डॉक्टरांची संख्या
Indian Medical Association (IMA) says 719 doctors died during second wave of COVID-19 pandemic; maximum 111 doctors lost their lives in Bihar, followed by Delhi (109) pic.twitter.com/4CCFSIMZj6
— ANI (@ANI) June 12, 2021
भारतामधील कोविड रूग्णसंख्या आता हळूहळू कमी होण्याचा ट्रेंड कायम आहे. आज मागील 70 दिवसांमधील सर्वात कमी रूग्णांची नोंद झाली आहे. भारतात मागील 24 तासांत 84,332 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 4002 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 कोटी 93 लाख 59 हजार 155 वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा 3 लाख 67 हजार 81 वर पोहोचली आहे. सद्य घडीला देशात 10 लाख 80 हजार 690 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.