मुंबई मधील लोकप्रिय सार्वजनिक गणेशोत्सवांपैकी एक लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा आज संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर 'गणेश मुहूर्त पूजन' सोहळा संपन्न झाला आहे. यंदा लालबागच्या राजाचं 92 वं वर्ष आहे. गणेश मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते सकाळी ठीक 6 वाजता लालबागच्या राजाचे मूर्तिकार कांबळी आर्ट्स यांच्या कार्यशाळेत हा सोहळा संपन्न झाला आहे.
लालबागच्या राजाचा 'गणेश मुहूर्त पूजन' सोहळा
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)