Shiv Pratap Din 2020 (Photo Credits: File)

Shiv Pratap Din 2021 Date: प्रत्येक मराठ्याचे रक्त सळसळून निघेल अशी ऐतिहासिक घटना 10 नोव्हेंबर 1659 रोजी घडली. स्वराज्यावर वाकडी नजर ठेवून चाल करुन आलेल्या आदिलशाहीचा बलाढ्य सरदार अफजल खानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati22 Shivaji Maharaj) वध केला. हा दिवस इतिहासामध्ये सोनेरी अक्षराने लिहावा असा आहे. अफजलखानाचा (Afzal Khan) वध हा प्रसंग आठवला तरी अंगावर काटा आल्याखेरीज राहणार नाही. या दिवसाची आठवण म्हणून हा दिवस शिवप्रताप दिन (Shiv Pratap Din) म्हणून साजरा केला जातो. प्रतापगडावर झालेली अफजलखान आणि छत्रपती शिवरायांची भेट आणि त्या भेटीत अफजलखानाने दिलेला दगाफटका ज्यास तोडीस तोड असे शिवरायांनी दिलेले उत्तर आणि अफजलखानाचा केलेला वध या सर्व गोष्टी आजही तितक्याच ताज्या आहेत.

अनेक चित्रपटांतून या ऐतिहासिक क्षणाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. काळजात धस्स करणा-या या क्षणाचा पाहूया चित्रपटातील एक व्हिडिओ हेदेखील वाचा- Shivrajyabhishek Sohala: शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी करण्यात आलेल्या 'या' खास गोष्टी ऐकून तुमच्या अंगावर उभा राहिल रोमांच

मराठ्यांच्या साम्राज्यावर चाल करुन आलेल्या या हुशार, बलाढ्य, शक्तिशाली अफजल खानाला शिवाजी महाराजांनी आपल्या अचूक रणनीतीने ढेर केले. या घटनेने प्रजा सुखी झाली आणि स्वराज्यावर आलेले संकट छत्रपतींनी पळवून लावल्याने गावागावात आनंदोत्सव राहिला होता. त्यांच्या या विश्वासाच्या जोरावर छत्रपतींनी रयतेचे राज्य घडवले.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत! आदर्श राज्यकर्ता म्हणून त्यांचे नाव अगदी अगत्याने घेतले जाते. जनमानसांत आपल्या गुणांमध्ये अढळ स्थान निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना आज राज्याभिषेक दिनी मानाचा मुजरा!