Aaditya Thackeray यांच्या वाढदिवसानिमित्त Riteish Deshmukh याने आदित्य यांचा 'माझा प्रिय भाऊ' असा उल्लेख करत दिल्या शुभेच्छा
Aaditya Thackeray and Ritiesh Deshmukh (Photo Credits: Instagram)

महाराष्ट्राचे तरुण, तडफदार आणि कॅबिनेट मंत्रिपद मिळवलेले महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray Birthday) यांचा आज वाढदिवस...आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांकडून, मित्रपरिवाराकडून, सहका-यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांनी सोशल मिडियाद्वारे आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर रितेशने आदित्य ठाकरे यांच्यासोबतचा एक छान फोटो शेअर करुन त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दिल्या आहेत. यात त्यांनी 'माझा प्रिय भाऊ' असा आदित्य ठाकरे यांचा उल्लेख करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

"माझ्या प्रिय भावा आदित्य ठाकरे तू खूप अद्वितीय असे यश मिळवले आहे. जे अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. तुझ्या वाढदिवसानिमित्त तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो आणि तुझे आयुष्य सुख-समृद्धीचे आणि निरोगी आरोग्याचे जावो हिच सदिच्छा" असा सुंदर संदेश रितेशने या फोटोखाली लिहत आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.हेदेखील वाचा- Aaditya Thackeray Birthday Special: महाराष्ट्र सरकार मधील सर्वात तरूण कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतलेले महत्त्वाचे 7 निर्णय

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

दरम्यान महाराष्ट्राचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी देखील आपल्या वाढदिवसाबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. आदित्य ठाकरे यांनी उद्या म्हणजेच 13 जूनला आपला वाढदिवस साजरा करणार नसल्याची घोषणा केली आहे. यासंबंधीचे त्यांनी ट्विट देखील केले आहे.

"मागील वर्षापासून आपण कोरोनाच्या महासंकटाशी लढत आहोत आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले. आपल्याला आता संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज व्हायचे आहे. मास्क लावणे, अंतर पाळणे, गर्दी होऊ न देणे हा या आजाराला हरवण्याचा हमखास उपाय आहे. त्यामुळेच यंदा माझ्या वाढदिवसानिमित्त कोणताही कार्यक्रम, सोहळा करण्याचे टाळत आहे" असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.