Happy Birthday Aaditya Thackeray: महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे आणि पवार या दोन कुटुंबांना विशेष महत्त्व आहे. त्यापैकी ठाकरेंच्या कुटुंबातून पहिल्यांदाच निवडणूक लढून थेट विधानसभेत एंटी घेऊन कॅबिनेट मंत्री झालेल्या आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्याकडून राज्याला खूप अपेक्षा आहे. राजकारण म्हणजे दलदल अशी ओळख असलेल्या एका करियरला आदित्य ठाकरेंसारख्या उच्चशिक्षित तरूणाने पूर्णवेळ करियर म्हणून निवड केल्याने वेगळी ओळख मिळाली आहे. राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे काही जण पाहत आहेत. आज 13 जून 2021 दिवशी आदित्य ठाकरे त्यांचा 31 वा वाढदिवस (Aaditya Thackeray Birthday) साजरा करत आहेत. घरातूनच राजकारण आणि समाजकारणाचा वसा घेतलेले आदित्य मागील दीड वर्ष राज्याचं पर्यटन आणि पर्यावरण खातं, राजशिष्टाचार मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री अशी जबाबदारी निभावत आहेत. त्यांच्या या पहिल्याच कॅबिनेट मंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांना कोविड 19 सारख्या जागतिक महामारी चा देखील सामना करत आपली जबाबदारी निभावायची आहे. या तारेवरच्या कसरतीमध्ये त्यांनी मंत्री पदाची जबाबदारी निभावत घेतलेले हे निर्णय राज्याला अभिमानास्पद आहेत. (नक्की वाचा: Raj Thackeray पाठोपाठ पुतण्या आदित्य ठाकरे यांनी घेतला 'हा' मोठा निर्णय, ट्विटद्वारे दिली माहिती).
मुंबई 24X7
मुंबई नाईटलाईफ किंवा मुंबई 24X7 ही संकल्पना देखील आदित्य ठाकरेंनी प्रत्यक्षात उतरवली आहे. सध्या कोरोनामुळे याला ब्रेक आहे. पण या संकल्पने अंतर्गत रहिवासी भाग नसलेल्या ठिकाणी दुकानं, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, मॉल, थिएटर्स 24 तास खुली राहू शकतात. यामुळे नगरिकांना 24 तास सेवा आणि यामुळे रोजगार निर्मितीला हातभार लागणार आहे.
आरे जंगल
मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरात आता मध्यभागी भागात विस्तीर्ण जंगल होणार आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वीच आरे आणि अन्य ठिकाणी 812 एकर जमीन राज्य सरकारकडून वन विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे. पर्यावरण मंत्रालयाने यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. काही वर्षांपूर्वीपासून 'आरे कारशेड' हा चर्चेचा विषय आहे. पण एक पर्यावरणप्रेमी म्हणून आदित्य ठाकरेंनी आरे जंगल वाचवण्याचा आपला निर्धार अल्पावधीतच पूर्ण केला आहे.
बीएमसी ऑफिस हेरिटेज वॉक
View this post on Instagram
पर्यावरण खात्यासोबत आदित्य ठाकरेंकडे पर्यटन विभागही आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईत काही मोक्याच्या ठिकाणांना पर्यटनाच्या दृष्टीने चालना देण्यासाठी त्यांनी काम सुरू केले आहे. काही जुन्या वास्तूंचं पुर्नजीवन करण्यापासून आता बीएमसी कार्यालयाचा हेरिटेज वॉक मुंबईकर आणि पर्यटकांसाठी खुला करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. यामध्ये आता ब्रिटीशकालीन आणि गौथिक शैलीत साकरालेल्या बीएमसी इमारतीचं रूप आतून बाहेरून पाहता येतं. दरा शनिवार-रविवारी ही सशुल्क गाईड सह टूर उपलब्ध आहे.
माझी वसुंधरा अभियान
माझी वसुंधरा अभियान हे निसर्गाच्या 5 तत्त्वांना जोडणारं आणि त्यांच्याप्रति आदरभाव व्यक्त करायला लावणारं आहे. विकास करताना तो शाश्वत विकास अर्थात सस्टेनेबल डेव्हलपमेंट कशी होईल यासाठी प्रत्येकाला कटिबंध करणारे अभियान देखील निसर्गाचा खूप मोठ्या प्रमाणातील र्हास कमी करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. पृथ्वी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा देखील घेण्यात येते आणि त्यांचं मूल्यमापन केले जाते.
Protection and Preservation of Trees Act, 1975
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वीच राज्य सरकाराने Protection and Preservation of Trees Act, 1975 ला परवानगी दिली आहे. यामध्ये आता शहरी भागामध्ये हिरवळ वाढवण्यासाठी तसेच शहरातील प्राचीन वृक्षांचं जतन करण्यास मदत होणार आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रॉक क्लाईबिंग
View this post on Instagram
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गांधी टेकडी येथे निसर्गाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता, 35 फूट उंच दगडावर 'रॉक क्लाइंबिंग' सुरू झाले आहे. सध्या हे केवळ प्रशिक्षितांसाठी असून लवकरच इथेच प्रशिक्षण वर्ग देखील सुरू करण्याचा मानस आहे. त्यामुळे मुंबई शहरातच अनेकांना अॅडव्हेंचर स्पोर्ट्सचा आनंद घेता येईल.
कॅराव्हॅन पर्यटन धोरण
View this post on Instagram
कॅराव्हॅन पर्यटन धोरण देखील महाराष्ट्राच्या पर्यटनाचा चेहरा मोहरा बदलण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकते. यामध्ये बस किंवा गाडीमध्येच राहण्याची, खाण्या-पिण्याची सोय होणार असल्याने अनेक पर्यटकांना राज्यातील सुंदर पण दुर्गम भागातील नजारा पाहता येणार आहे.
दरम्यान 2011 साली युवासेना प्रमुख म्हणून आदित्य ठाकरेंचं राजकारणात आगमन झालं. तरूणांचं नेतृत्त्व करणार्या आदित्य ठाकरेंनी आता राज्याच्या पातळीवर नेतृत्त्वाची जबाबदारी स्वीकारली आहे. आज 31 व्या वाढदिवशी या युवा नेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!