महाराष्ट्रातील कोरोनाची सद्य परिस्थिती पाहता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी यावर्षी आपला वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले आहे. त्याबाबत त्यांनी अधिकृतरित्या ट्विटद्वारे आपल्या चाहत्यांना आणि कार्यकर्त्यांना माहिती दिली आहे. येत्या 14 जूनला राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. दरम्यान महाराष्ट्राचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी देखील आपल्या वाढदिवसाबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. आदित्य ठाकरे यांनी उद्या म्हणजेच 13 जूनला आपला वाढदिवस साजरा करणार नसल्याची घोषणा केली आहे. यासंबंधीचे त्यांनी ट्विट देखील केले आहे.
"मागील वर्षापासून आपण कोरोनाच्या महासंकटाशी लढत आहोत आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले. आपल्याला आता संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज व्हायचे आहे. मास्क लावणे, अंतर पाळणे, गर्दी होऊ न देणे हा या आजाराला हरवण्याचा हमखास उपाय आहे. त्यामुळेच यंदा माझ्या वाढदिवसानिमित्त कोणताही कार्यक्रम, सोहळा करण्याचे टाळत आहे" असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.हेदेखील वाचा- Raj Thackeray यांचं वाढदिवसांच्या पार्श्वभूमीवर भेटण्यासाठी गर्दी टाळण्याचं मनसे सैनिकांना आवाहन; लवकरच पक्षांच्या धोरणाविषयी संवाद साधण्याचे दिले संकेत
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 11, 2021
"माझी आपणा सर्वांना हीच विनंती आहे की कृपया कुठेही गर्दी करु नका. आपण मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी येऊ नये, ही नम्र विनंती. आपण प्रत्यक्ष भेटला नाहीत तरी आपणा सर्वांच्या शुभेच्छा, प्रेम, आशीर्वाद माझ्यासोबत आहेतच आणि त्या कायम राहतील, हा विश्वासही आहे. वाढदिवसानिमित्त होर्डिंग्स, हार, केक अशा गोष्टींवर खर्च करू नये, असेही मला मनापासून वाटते. त्याऐवजी कोरोनाला हरवण्यासाठीचे नियम पाळणे, इतरांना शक्य ती मदत करणे हीच वाढदिवसाची अमूल्य भेट. घरी रहा, सुरक्षित रहा." असेही ते पुढे म्हणाले.
दरम्यान काल सकाळी राज ठाकरे यांनी एक पत्रक काढून आपण यंदा वाढदिवस साजरा करणार नसल्याने कुणीही आपणास भेटण्यास येऊ नये आवाहन केले आहे. माझे सहकारी म्हणून तुम्ही हे नक्की मसजून घ्याल. हे वातावरणच असं आहे की आपण सावध असलं पाहिजे. खबरदारी घेतली पाहिजे. प्रवास करणं, मोठ्या प्रमाणात गर्दी करणं, गाठी-भेटी अशा गोष्टी करणं अजूनही टाळल्या पाहिजेत. असे आवाहन त्यांनी आपल्या ट्विटद्वारे केले आहे.