Raj Thackeray | (Photo Credits: File Photo)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा 14 जून दिवशी वाढदिवस असतो. या दिवशी महाराष्ट्र भरातून मनसे कार्यकर्ते आणि मनसे सैनिक राज ठाकरेंना भेटण्यासाठी कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी भेटण्यासाठी गर्दी करतात. पण राज्यातील कोरोना परिस्थिती अद्यापही पूर्णपणे नियंत्रणात आलेली नसल्याने राज ठाकरेंनी मनसे सैनिकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गर्दी टाळण्याचं नम्र आवाहन केले आहे. सोशल मीडीयात जारी केलेल्या पत्रकामध्ये त्यांनी जेथे आहात तेथेच सुरक्षित रहा असं आवाहन केले आहे.

दरम्यान राज ठाकरेंनी जारी केलेल्या पत्रकामध्ये थोड्याच दिवसात तुम्हांला भेटणार आहे. पक्षांच्या धोरणाविषयी, नव्या कार्यक्रमांविषयी बोलणार असल्याचं सांगितलं आहे. आता महाराष्ट्राला आपल्या कामातून एक दिलासा देण्याची, आश्वस्त करण्याची गरज असल्याचंही त्यांनी मनसे सैनिकांना म्हटलं आहे. (नक्की वाचा: मुंबई, पुणे, नाशिक आदी भागात चित्रिकरण करायला काहीच हरकत नाही- मनसे अध्यक्ष राज ठाकरे).

राज ठाकरे यांचं आवाहन

यंदा 14 जूनला राज ठाकरेंचा 53 वा वाढदिवस आहे. दरवर्षी राज ठाकरे शिवाजी पार्क येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांना भेटतात. पण सध्या महाराष्ट्रात अनलॉक 5 टप्प्यांत सुरू झालेला असला तरीही अनेक गोष्टींवर निर्बंध कायम आहेत. तसेच सोशल डिस्ट्न्सिंग पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.