
India National Cricket Team vs England National Cricket Team: बर्मिंगहॅममधील एजबेस्टन मैदानावर 2 जुलैपासून इंग्लंड (England) आणि भारत (India) यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना (Test Match) सध्या तिसऱ्या दिवसापर्यंत पोहोचला आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने (Team India) पहिल्या डावात 151 षटकांत सर्व गडी गमावून 587 धावांचा डोंगर उभा करत मोठी धावसंख्या नोंदवली. भारताकडून कर्णधार शुभमन गिलने (Shubman Gill) सर्वाधिक 269 धावांची शानदार आणि ऐतिहासिक खेळी साकारली. त्याच्या या द्विशतकी खेळीने अनेक विक्रम मोडले. इंग्लंडसाठी शोएब बशीरने (Shoaib Bashir) तीन बळी घेतले, तर ख्रिस वोक्स (Chris Woakes) आणि जो टंग (Josh Tongue) यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवत भारताला रोखण्याचा प्रयत्न केला.
England end on 407 in the first innings thanks to the heroics of Harry Brook and Jamie Smith 🏴
🔗 https://t.co/t4iTZ4cwcz pic.twitter.com/w6IDaGK2w8
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) July 4, 2025
भारताच्या विशाल धावसंख्येला प्रत्युत्तर देण्यासाठी आलेल्या इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात सर्वबाद 407 धावा केल्या. यासह भारताने 180 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. इंग्लंडकडून युवा फलंदाज हॅरी ब्रूकने 158 धावांची दमदार खेळी केली, तर जेमी स्मिथने नाबाद 184 धावांची अविस्मरणीय खेळी करत भारताला कडवी टक्कर दिली. (हे देखील वाचा: Shubman Gill Michael Vaughan: मायकल वॉनचं गिल अँड कंपनीला आव्हान; 'कोहलीने जे एकट्याने केलं, ते करून दाखवा!')
भारतासाठी गोलंदाजीमध्ये मोहम्मद सिराजने आपल्या भेदक माऱ्याने घेत इंग्लंडच्या फलंदाजीला खिंडार पाडले. त्याला युवा वेगवान गोलंदाज आकाश दीपने चार विकेट घेऊन उत्कृष्ट साथ दिली. आता भारतीय संघ दुसऱ्या डावासाठी या सामन्यात अजूनही दोन्ही संघ विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत आणि पुढचे डाव रोमांचक होण्याची शक्यता आहे.